घरठाणेAjit Pawar : आव्हाडांकडून अजित पवारांचा 'तो' फोटो ट्वीट; आनंद परांजपेंनी दिले...

Ajit Pawar : आव्हाडांकडून अजित पवारांचा ‘तो’ फोटो ट्वीट; आनंद परांजपेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर

Subscribe

ठाणे : अजित पवार यांनी बंडखोरी केल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ‘कोल्ड वॉर’ सुरू झालं आहे. दोन्ही गटातील नेत्यांनी आता थेट ऐकमेकांचे नाव न घेत टीका करण्यास सुरुवात केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांच्या वाढलेल्या पोटावर टिप्पणी केली आहे. दादा तुम्ही व्यायाम करुन ‘सिक्स पॅक अब्ज’ तयार केले असतील. पण हा परवाचा फोटो त्यात तुमची ढेरी दिसतेय, असे म्हणत आव्हाडांनी अजित पवारांचा एक फोटो ट्वीट केला होता. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्र्वादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (Ajit Pawar photo Jitendra Awhad Tweet Anand Paranjape gave a strong reply)

हेही वाचा – आम्ही दिल्लीत गेल्यावर ‘कठपुतली’ म्हणणाऱ्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय नाकही…; एकनाथ शिंदे कडाडले

- Advertisement -

आनंद परांजपे म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांनी काल मध्यरात्री अजित पवार यांचा एक फोट ट्विट केला होता. हा फोटो त्यांनी कोणत्या अवस्थेत ट्वीट केला हे माहित नाही. पण आज त्यांनी अजित पवार यांना लवासा प्रकरणी, सिंचनप्रकरणी डिफेंड केल्याचा दावा केला आणि आपण कोणावरही व्यक्तीगत टीका करत नाही असे म्हटले. मुळात जितेंद्र आव्हाड यांना त्यावेळी महाराष्ट्रात प्रसिद्ध व्हायचे होते. टीव्ही चॅनलवर आपला टीआरपी वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. परंतु अजित पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असताना 2009 ते 2014 साली आव्हाड यांच्या कळवा-मुंब्रा या मतदारसंघात सर्वाधिक निधी दिला. यामुळेच आव्हाड यांच्या मतदारसंघात विकासाची कामे झाली आहेत, अशी माहिती आनंद परांजपे यांनी दिली.

आनंद परांजपे म्हणाले की, विनयभंगाच्या केसमध्ये जितेंद्र आव्हाड खचले असताना त्यांच्या घरी साडेतीन तास अजित पवार त्यांना धीर देत बसले होते, पोलीसांनी खोटे गुन्हे दाखल केले म्हणून अजित पवार यांनी त्यांना झापले होते. आव्हाड हे तेव्हा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत होते. यावेळी धीर देऊन अजित पवार यांनी त्यांना सावरले होते. अजित पवार हे नेहमी जितेंद्र आव्हाड यांच्या मागे सह्यादीसारखे ठाम उभे राहिले. पण आव्हाड यांनी कायमच अजित पवार यांचा तिरस्कार करत आले. अजित पवारांविरोधात आम्हांला आंदोलन करायला लावले, असा आरोपही आनंद परांजपे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – NCRB रिपोर्ट कसा वाचावा याचं प्रशिक्षण विरोधी पक्षाला देण्याची आवश्यकता; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

जितेंद्र आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे तोंड कोंबडीच्या कोणत्या भागासारखे दिसते, उपसभापती निलम गोऱ्हे या राजकारणात किती साड्या बदलतात, अशी टीका केली याआधी केली आहे. तसेच पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचा आरोप करताना चिक्की खाताना जितेंद्र आव्हाड यांनी केलेले बिबस्त तोंड सर्वांनी पाहिले आहे. किरीट सोमय्या व त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संडासातील पैसे खाल्ले, अशाप्रकारची व्यक्तीगत टीका जितेंद्र आव्हाड यांनी नेहमीच केली आहे. पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -