घरताज्या घडामोडीसर्वसामान्यांचे सरकार, आम्हाला नुसतं खेळवतायत.., अजित पवारांनी सांगितला कॉलचा किस्सा

सर्वसामान्यांचे सरकार, आम्हाला नुसतं खेळवतायत.., अजित पवारांनी सांगितला कॉलचा किस्सा

Subscribe

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारच्या कॉलचा किस्सा सांगितला. हे सरकार गोरगरीबांचे नाही. मी कामासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे वेळ मागतो. त्यावेळी कॉल केल्यानंतर दादा देऊ, काही काळजी करू नका, लवकरच देऊ. असं दोघेही पॉझिटिव्ह बोलतात. निगेटिव्ह अजिबात बोलत नाहीत. दोघांचे नक्की काय सुरू आहे ते त्यांनाच त्यांचे माहित नाही. आम्ही नुसतं खेळवतायत की फक्त चालढकल करतायत की वेळ मारून नेतायत हे कळायला मार्ग नाही, अशा शब्दांत अजित पवारांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

कुणी वेळ मागितला तर वेळ द्यायचो असतो. सत्तेवर नसताना सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह बोलणं सोपं असतं पण सरकारमध्ये आल्यानंतर त्या निर्णयाबद्दलचा अंतिम निर्णय घेऊन पुढे मार्ग काढायचा असतो. परंतु तसे काम करताना हे सरकार पाहायला मिळत नाही, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

आमचं सर्वसामान्यांचं सरकार बोलणं मात्र कुठेही महागाई कमी करण्याचा, कारखाने बाहेर केले ते परत येण्याकरिता प्रयत्न होत नाहीत. उलट बाहेरचे मुख्यमंत्री येतात येथल्या उद्योगपतींना, बॉलिवूड आणि विविध क्षेत्रांना तुम्ही आमच्याकडे चला बोलतात. तरीही आमचे सर्वसामान्यांचे सरकार सुरू आहे, असा टोला पवारांनी सरकारला लगावला.

महापुरूषांबद्दल बेताल वक्तव्य करण्याचं काम काहीजण जाणीवपूर्वक करत आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्याचं काम सुरू आहे. यासाठी सरकारने एक नवीन धोरण किंवा नवीन कायदा करावा, अशी मागणी करणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय.

- Advertisement -

हेही वाचा : लोकशाहीला टिकवण्यासाठी विरोधी पक्ष टिकला पाहिजे; जयंत पाटलांचा राज्य सरकारवर निशाणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -