Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रAjit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

Subscribe

विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या महायुती सरकारमधून मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला मिळणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? तसेच कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला याची माहिती दिली आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या महायुती सरकारमधून मुख्यमंत्रीपदाची संधी कोणाला मिळणार? नव्या सरकारचा शपथविधी कधी होणार? तसेच कोणत्या पक्षाला किती खाती मिळणार? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. तसेच राज्यात नवीन सरकार स्थापन होत नसल्याने विरोधकही महायुतीवर निशाणा साधताना दिसत आहे. याचपार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला याची माहिती दिली आहे. (Ajit Pawar told what decision was taken regarding the Chief Minister and Deputy Chief Minister)

आत्मक्लेश उपोषण करणाऱ्या बाबा आढाव यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना विरोधकांकडून ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याच्या आरोपाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, ईव्हीएममध्ये घोटाळा झाला असेल तर तो त्यांनी सिद्ध करून दाखवला पाहिजे. ईव्हीएम समोर ठेवून ते कसं चुकीचं आहे, ही गोष्ट ते दाखवत नाहीत. त्यांच्याकडून नुसता रडीचा डाव सुरू आहे. अनेकांचा दारुण पराभव झाल्यामुळे त्याचं खापर ईव्हीएमवर आणि आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जात आहे. पण सरकार म्हणून आम्ही योजना आणणारच ना? आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर जनतेला लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न केला आहे, अशी भूमिक पवार यांनी मांडली.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न

मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी कधी होणार? असा प्रश्न विचारला असता अजित पवार यांनी अंदाजे 5 तारखेला होईल, असे सांगितले. तसेच खातेवाटप कधी होईल, असा विचारल्यावर ते म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर खातेवाटपाचा संपूर्ण अधिकार त्यांचा असतो. ते खातेवाटप जाहीर करतील आणि त्याप्रमाणे प्रत्येकाला पद दिलं जाईल, अशी माहिती पवार यांनी दिली.

- Advertisement -

भाजपाचा मुख्यमंत्री, उरलेल्या दोन पक्षांना उपमुख्यमंत्रीपद

दरम्यान, मुख्यमंत्री कोण होईल? असा प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले की, सध्या प्रचंड बहुमताचे महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आम्ही जे काही पाच वर्षांचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, त्याची अंमलबजावणी करण्याला प्राधान्यक्रम देणार आहोत. तसेच भाजपाचा मुख्यमंत्री होईल हा निर्णय झाला आहे. याशिवाय उरलेल्या दोन पक्षांचे दोन उपमुख्यमंत्री होतील हा निर्णय देखील झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – Baba Adhav : तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन; ठाकरेंच्या उपस्थितीत बाबा आढावांनी सोडले उपोषण 


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -