घरताज्या घडामोडीस्वत:चा फोटो मोठा आणि आम्हाला एकाच फोटोत बसवलं, अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची...

स्वत:चा फोटो मोठा आणि आम्हाला एकाच फोटोत बसवलं, अजित पवारांनी घेतली कार्यकर्त्याची फिरकी

Subscribe

विरोधी पक्षनेते अजित पवार पक्षाच्या विविध कामानिमित्त पुण्यात होते. त्यांच्या हस्ते पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पार पडले. यावेळी छत्रीवाटपाचा कार्यक्रमही पार पडला. या छत्रीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. यावरूनच अजित पवार यांनी कार्यकर्त्याची फिरकी घेतली. स्वत:चा फोटो मोठा, प्रशांत जगतापांचा फोटो मोठा आणि आम्हाला तिघांना एकाच फोटोत ठेवले, अशी फिरकी अजित पवार यांनी कार्यकर्त्याची घेतली.

पक्षाचे विविध कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. राज्यात मंत्रिमंडळ विस्ता अद्याप झालेला नाही. सरकार येवून ३५ दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र दोघेच कारभार पाहत आहेत. मंत्रिमंडळ विस्तारावर विचारले, असता लवकरच करू, असे ते सांगतात, असं अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

मी गेली ३२ वर्षे समाजकारण, राजकारण करणारा कार्यकर्ता आहे. अनेक लोक मला सकाळपासून भेटतात. सगळ्यांचीच कामे माझ्याकडून होतात, असा माझा दावा नाही. पण आलेल्या लोकांचे म्हणणे आणि अडचणी समजावून घेतल्या पाहिजेत, असं पवार म्हणाले.

अधिकाऱ्यांशी चांगले वागले की, सत्ता नसतानाही अधिकारी चांगले वागतात. अनेक जण सत्ता असताना अधिकाऱ्यांशी चांगले वागत नाही. परंतु सत्ता गेल्यावर अधिकारी त्यांना धडा शिकवतात, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून सतत अजित पवार हे मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपला डीवचत आहेत. मंत्रिमंडळ विस्तार लांबल्याने लोकांचे कामं रखडली आहेत. तसेच अधिवेशनही रखडलं आहे, जर तुमच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर मंत्रिमंडळ विस्तार करायला का घाबरताय, असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला.


हेही वाचा : 15 ऑगस्टच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार का?, देवेंद्र फडणवीस म्हणतात…


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -