उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अजित पवार निधी वाटपासंदर्भात नारज असल्याचा दावा केला जात आहे.
दादा भुसे हे धुळे दौऱ्यावर आले असताना त्यांनी निधी वाटपाच्या संदर्भात अजित पवार नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. महायुती सरकार मजबूत असून सर्व निर्णय सांमस्याने घेतले जात आहेत, अजित पवार निधी वाटपा संदर्भात नाराज नसल्याचे भुसे यांनी म्हटले आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांनंतर शिंदे गटाचे अनेक नेते भाजपमध्ये जाणार असा दावा संजय राऊत यांनी केला होता. तर दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊत यांना महाराष्ट्र आता महत्त्व देत नाही, सकाळी काही ना काही उठून बोलावे लागते म्हणून त्यांनी हे विधान केले आहे. अशी टीका राऊत यांनी केली आहे.
भाजपकडून हिंदू – मुस्लिम पेटविण्याचा सतत प्रयत्न असतो. मराठा विरूध्द ओबीसी वाद पेटविण्याचं काम भाजप करत असा दावा संजय राऊत यांनी केला होता. यांच्या विधानाला भुसे यांनी उत्तर दिले. टीका करणाऱ्यांना महाराष्ट्र सतत पेटत ठेवायचा आहे. जरांगे पाटील यांचे प्रश्न मार्गी लागत आहेत. जरांगे पाटील यांच्या मागण्या पूर्ण होत आहेत,त्याचे दु: ख राऊतांना झाला असल्याचा टोला भुसे यंनी लगावला आहे .