घरमहाराष्ट्रAjit Pawar vs Awhad : 'ती' पदे अवैध होती का? जितेंद्र आव्हाडांचा...

Ajit Pawar vs Awhad : ‘ती’ पदे अवैध होती का? जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना प्रश्न

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची नियुक्ती अनाधिकृत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वतीने सांगण्यात येते. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदापासून विरोधी पक्षनेते पदापर्यंत अजित पवार यांची नियुक्ती करण्याचे पत्र जयंत पाटील यांनी दिले होते. मग ही पदे अवैध होती का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केला.

हेही वाचा – Ajit Pawar : आव्हाडांकडून अजित पवारांचा ‘तो’ फोटो ट्वीट; आनंद परांजपेंनी दिले जोरदार प्रत्युत्तर

- Advertisement -

शरद पवार यांच्या विरोधात आम्ही नाहीत, असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे. मग तुम्ही पक्ष का फोडत आहात? तुम्ही तुमचा पक्ष का काढत नाही? असे सवाल डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची देखील नियुक्ती करण्यात आली होती तर, ती नियुक्ती देखील अनधिकृत होती का? असा प्रश्न देखील जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

सन 2004मध्ये पी.ए. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर केंद्रीय निवडणूक आयोगात दावा दाखल केला होता, त्यावेळी निवडणूक आयोगाने निकाल देत म्हटले होते की, ‘शरद पवार यांच्यासोबत सर्वाधिक पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा दिसत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा करण्याचा संगमा यांना अधिकार नाही. संगमा यांनी नवीन पक्ष स्थापन करून पुढे जावे,’ असे आयोगाने म्हटले होते. आजची परिस्थितीत देखील तशीच आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारणीमधील 28 सदस्यांपैकी 16 सदस्य शरद पवार यांच्या पाठीशी उभे आहेत, याकडे जितेंद्र आव्हाड यांनी लक्ष वेधले.

- Advertisement -

हेही वाचा – Ajit Pawar VS Vijay Wadettiwar सरकारच्या उधळपट्टीमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत; वडेट्टीवारांच्या आरोपांवर अजित पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 आमदारांच्या पाठिंब्याच्या जोरावर 2019 साली अजित पवार यांनी भाजपासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यांना हे माहीत नसावे की आमदारांच्या सह्यांचे ते पत्र चोरण्यात आले होते. त्यामुळेच अजित पवारांना 72 तासांत राजीनामा द्यावा लागला होता. त्यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपद आणि त्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपदाचे फायदे घेतले आहेत, असेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

अजित पवार यांच्या वकिलांच्या बोलण्यात सतत विरोधाभास जाणवत आहे. एकीकडे ते म्हणतात की, शरद पवार यांच्याबद्दल आम्हाला काहीच बोलायचे नाही आणि दुसरीकडे, शरद पवार यांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून झालेली नेमणूक बेकायदा असल्याचे सांगतात. पवार यांच्याविरोधात निवडणूक आयोगात देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात अनेक गोष्टी लिहिल्या आहेत. पक्षाचे मालक असल्याप्रमाणे शरद पवार यांची वागणूक होती, असे त्यांनी लिहिले आहे. पण, प्रफुल्ल पटेल यांनी सप्टेंबर 2022 मध्ये निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आम्ही एक ठराव घेतला आहे. ज्यामध्ये नेमणुकीचे सर्व अधिकार राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आम्ही एकमताने देत आहोत. म्हणजेच, निवडणूक आयोगासमोर करण्यात येत असलेला युक्तिवाद दिशाभूल करण्यासाठी आहे, हे यावरून उघड होत असल्याचे आव्हाड म्हणाले.

हेही वाचा – Legislative session : निवडणूक निकालाने विरोधक गलितगात्र, मुख्यमंत्री शिंदे यांची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -