Ajit Pawar vs Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी बीडमध्ये सभा घेत अजित पवार (Ajit Pawar) आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर टीकास्त्र सोडले होते. दरम्यान आता उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये सभा घेऊन शरद पवारांना प्रत्युत्तर देणार आहे. मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे. (Ajit Pawar vs Sharad Pawar Ajitdada will reply to Sharad Pawar A meeting will be held in Beed on this day)
हेही वाचा – Ajit Pawar : आधी पिसिंग-पिसिंग म्हणायचे आता किसिंग किसिंग सुरू…”; दानवेंनीही फडणवीसांना लगावला टोला
अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील 8 आमदारांनी बंडखोरी करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पक्षात फुट पडली आहे. त्यानंतर शरद पवार यांनी राज्यत्रर सभांचा धडाका लावला आहे. त्यांनी नाशिक पाठोपाठ बीड शहरात सभा घेतली. या सभेत त्यांनी बीड जिल्ह्यात अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांवर विशेषतः धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता या टीकेला स्वतः धनंजय मुंडे आणि अजित पवार काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे दिनांक 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 19, 2023
धनंजय मुंडे यांनी ट्वीट करताना म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बीड येथे 27 ऑगस्ट रोजी जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत. ही सभा रद्द झाल्याबाबत माध्यमांवर येणाऱ्या बातम्या पूर्णपणे चुकीच्या असून माध्यम प्रतिनिधींनी कृपया खात्री केल्याशिवाय सभेबद्दल अशा चुकीच्या व निराधार बातम्या देऊ नयेत, अशी विनंती त्यांनी केली आहे.
हेही वाचा – रामदास कदम यांना हटवा अन्यथा…, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पदाधिकाऱ्यांचा इशारा
बीडमध्ये नियोजित सभा होणारच
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बीडला सभा झाल्यानंतर त्याला उत्तर देणारी उत्तर सभा ही बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंडवर होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी सुद्धा बीडमध्ये नियोजित सभा होणारच असल्याचे सांगितले आहे. बीडमध्ये होणाऱ्या या सभेला मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नऊ मंत्री येणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले आहे.
साहेबांनी सभा घेतली तर सभेनेच उत्तर देणार
दरम्यान, अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचे म्हटले होते. यानंतर अजित पवार यांनी सांगितले होते की, शरद पवार यांनी सभा घेतली तर, मला पण सात दिवसांनी त्याठिकाणी सभा घ्यावी लागेल आणि उत्तर द्यावं लागेल. जर मी गप्प बसलो तर जनता म्हणेल ह्याच्यात खोट आहे, पण मित्रांनो माझ्यात खोट नाही, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांनी त्यावेळी मांडली होती.