घरताज्या घडामोडीजन आशीर्वाद यात्रेचा फटका बसणार, नारायण राणेंच्या टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर

जन आशीर्वाद यात्रेचा फटका बसणार, नारायण राणेंच्या टीकेला अजितदादांचे प्रत्युत्तर

Subscribe

नारायण राणे यांनी केंद्रातील काम करावं आम्ही आमचं काम करतो - अजित पवार

भाजप नेत्यांच्या जन आशीर्वाद यात्रेचा फटका बसणार आहे. जिथे जिथे केंद्रीय मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा निघाली आहे तिकडे कोरोना रुग्णांची वाढ होण्याची शक्यता असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार अज्ञानी असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले होते त्या टीकेला प्रत्युत्तर देताना नारायण राणेंना त्यांचा लखलाभ असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच नारायण राणे केंद्रातील मंत्री आहेत त्यांनी केंद्रातील काम करावं आम्ही आमचे काम करतो असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवरुन अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या भूमिकेवरही सवाल उपस्थित केला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढ झाल्यास जबाबदार कोण याचा विचार केंद्राने केला पाहिजे असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला यावेळी नारायण राणेंनी केलेल्या टीकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर अजित पवार म्हणाले की, “मला त्या गोष्टीची जास्त चर्चा करायची नाही. त्यांचे त्यांना लखलाभ आम्हाला आमचं सरकार व्यवस्थित चालवायचे आहे. आम्ही ते चालवतो आहे. ते केंद्रात मंत्री आहेत त्यांनी त्यांचे केंद्रातील काम करावं आम्ही आमचं काम करतो” अशा शब्दात अजित पवार यांनी नारायण राणेंना टोला लगावला आहे.

- Advertisement -

केंद्राच्या भूमिकेवर सवाल

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहून राज्यातील सणासुदीच्या दिवसांत गर्दी टाळण्यासाठीचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत. यावर अजित पवार यांनी म्हटलं आहे की, एकीकडे केंद्र सरकार सांगत आहे निर्बंध घाला लक्ष द्या आणि दुसरीकडे नव्या चार केंद्रीय मंत्र्यांना सांगतात यात्रा काढा. त्या यात्रेत कशाप्रकारे गर्दी होते याचा फटका निश्चितपणे ज्या ठीकाणी गर्दी झाली त्या जागी काही दिवसांत फरक दिसेल. अर्थात तिकडे कोरोना रुग्णांची वाढ होऊ नये अशी आमची इच्छाच आहे. पण जर उद्या रुग्णवाढ झाली तर त्याला जबाबदार कोण याचा विचार देखील केंद्र सरकारने केला पाहिजे.

अजित पवार अज्ञानी – नारायण राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये माध्यमांशी संवाद साधता अजित पवार यांना अज्ञानी म्हटलं आहे. अजित पवार यांनी आपल्या खात्याकडे बघावं. अजून मी राष्ट्रवादीकडे वळलो नाही असा इशारा राष्ट्रवादीला देत नारायण राणे यांनी अजित पवार यांच्यावर टोला लगावला आहे की, आपल्या अंगावरील आरोप आणि केस कशा काढायच्या हे जर शिकायचं असेल तर अजित पवार यांच्याकडून शिकावं असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  ‘अजित पवार अजून अज्ञानी आहेत’; राणेंचा पलटवार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -