Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी बारामतीत तरुणीचा विनयभंग : मी कुणाचाही... अजित पवारांचा टुकार कारट्यांना थेट इशारा

बारामतीत तरुणीचा विनयभंग : मी कुणाचाही… अजित पवारांचा टुकार कारट्यांना थेट इशारा

Subscribe

बारामतीमध्ये भरदिवसा एका तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. ही घटना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या ‘सहयोग सोसायटी’ निवासस्थान परिसरामध्ये काल(शनिवार) घडली होती. याप्रकरणी बारामती पोलीस स्टेशनमध्ये आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, बारामती दौऱ्यात असलेल्या अजित पवारांनी याप्रकरणाचा उल्लेख करत कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असं म्हणत टुकार कारट्यांना थेट निर्वाणीचा इशारा दिला आहे.

एका खासगी कार्यक्रमामध्ये बोलताना अजित पवार म्हणाले की, शहरात वेडेवाकडे प्रकार घडता कामा नयेत. सहयोगच्या परिसरामध्ये काल जे काही घडलं. त्याबाबत वायएसपी, अतिरिक्त पोलीस अधिक्षकांना मी माझ्या पद्धतीने बोललो आहे. त्यांनी त्याची नोंद घेतली आहे. त्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. पण अशा प्रकारात मी कुणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.

- Advertisement -

बारामतीकर पालकांनो आपण आपल्या मुली, मुलांना ते कुठे जातात? कुणाशी बोलतात? त्यांचे मित्र परिवार, मैत्रिणी कोण आहेत? यांच्याकडे देखील लक्ष द्या. ही सुद्धा आई-वडिलांची जबाबदारी आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर आम्ही लोकप्रतिनिधी, पोलीस विभाग लक्ष द्यायला तयार आहोत. पण जसा काल प्रकार घडला, तसे प्रकार पुन्हा घडता कामा नये, असंही अजित पवार म्हणाले.

नेमकी घटना काय?

- Advertisement -

अजित पवार यांचं निवासस्थान असलेल्या बारामतीतील ‘सहयोग सोसायटी’च्या प्रवेशद्वाराजवळ एका तरुणीला मारहाण झाली. संबंधित तरुणी सहयोग सोसायटी येथे मेहंदी काढण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी अरफाज सादिक आत्तार याने तरुणीचा विनयभंग करुन तिला मारहाण केली. यामध्ये ती तरुणी जखमी झाली आहे. तसेच या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा : सत्तासंघर्षाचा निकाल आठवडाभरात? राजकारणात आणखी एक नाट्यमय वळणाची शक्यता


 

- Advertisment -