घरताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री वसुली करायला बसलेला नाही- अजितदादांनी 'त्याला' सुनावले

उपमुख्यमंत्री वसुली करायला बसलेला नाही- अजितदादांनी ‘त्याला’ सुनावले

Subscribe

एका व्यक्तीने माझे पैसे एकाकडे अडकले असून ते मिळवून देण्यासाठी मदत करा अशी विनंती दादांना केली.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. कुठलाही आडपडदा न ठेवता ते समोरच्याला कधी खडसावतात तर कधी त्यांच्या खास शैलीने समजही देतात. असाच एक प्रसंग आज बारामतीत एका कार्यक्रमात घडला. यावेळी पैशाची अडवणूक करणाऱ्याकडून पैसे मिळवून द्या अशी विनंती करणाऱ्याला दादांनी समज तर दिलीच त्याबरोबर उपमुख्यमंत्री वसुली करायला बसला नाही असेही खडे बोल सुनावले.

अजित दादा आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. येथील देसाई इस्टेटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने माझे पैसे एकाकडे अडकले असून ते मिळवून देण्यासाठी मदत करा अशी विनंती दादांना केली. दादांनी त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मात्र त्याला चांगलेच फैलावर घेतले. बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल. पण चांगल्या सवयी लावा. नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसलेला नाही अशा शब्दात त्यांनी संबंधित व्यक्तीला सुनावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -