मुंबई : नुकतीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना डेंग्यू झाला होता. त्यातून बरे झाल्यानंतर अजित पवारांनी काका प्रतापराव पवार यांच्या घरी कौटुंबिक स्नेह भोजनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर दिल्लीच्या दिशेने रवाना झाले होते. अजित पवार यांची अमित शाहा यांच्या भेटीवर विधानसभेचे विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधला आहे. अजित पवार हे दिल्लीचे चरणदास झाले असून आता अजित पवार आपली दादगिरी दाखवूच शकणार नाही, अशी टीक विजय वडेट्टीवारयांनी केली आहे.
अजित पवारांच्या दिल्लीवारीवर विजय वडेट्टीवार म्हणाले, “निधी मिळत नसल्यामुळे रडण्यापेक्षा दुसऱ्याला रवडण्याची हिंमत आहे का? हे आता दाखवण्याची गरज आहे. अजित पवार हे दिल्लीचे चरणदास झाले असून आता आपली दादगिरी दाखवूनच शकणार नाही. रडण्याची वेळ ही अजित पवार यांच्यावर आलेली आहे. अजित पवार भाजपसोबत आल्याने ते त्यांना रडवून रडवून सडवत आहेत. यामुळे आता त्यांच्यावर रडण्याची आणि सडण्याची वेळ आली असावी, अशी टीका खरपूस समाचार विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे.
हेही वाचा – शिंदे यांच्या टोळीचा ‘डीएनए’ही समोर आला, कीर्तिकर-कदम वादावर ठाकरे गटाचा टोला
पवारांना भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागेल
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “अजित पवार पुढच्या वेळेस भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागेल, असे चित्र दिसत आहे. तसेच कमळावर निवडणूक लढल्याशिवाय अजित पवारांकडे पर्याय नाही. हे मी ठामपणे सांगतोय, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा – खोट्या प्रतिज्ञापत्रावरील टीकेला अजित पवार गटाचे शरद पवार गटाला प्रत्युत्तर, म्हणाले…
मविआमध्ये असताना पवारांनी केली तिजोरी साफ
अजित पवार हे नेहमी हम करे सो कायदा, अशी भूमिका असते. महाविकास आघाडीमध्ये असताना ज्यांना वाटत होते की, निधी मिळत नाही. पण आता तिजोरीची चावी तुमच्याकडे आहे. यामुळे तुम्ही दुसऱ्यांची तक्रार काय करता. आता तुम्ही तुमचे धमक दाखवा, महाविकास आघाडीमध्ये असताना तुमची सगळी तिजोरी साफ करत होतात. मग आता अजित पवारांनी धमक दाखवावी.”