घरमहाराष्ट्रNana Patekar : अजित पवार शांत राहून काम करतात, जाहिरात करत नाहीत;...

Nana Patekar : अजित पवार शांत राहून काम करतात, जाहिरात करत नाहीत; नाना पाटेकरांकडून कौतुकाची थाप

Subscribe

पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. म्हणजे कोणीही पक्ष बदलणार नाही. पक्ष बदलायला काही तरी नियम असायला पाहिजेत. किमान शिक्षणाची तरी अट पाहिजे, असंही नाना पटोलेंनी अधोरेखित केलंय. आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. परंतु राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवलीय.

मुंबईः Nana Patekar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी स्तुतिसुमनं उधळलीत. अजित पवार जेवढी कामं करतात त्याची जाहिरात कधीच करत नाहीत, असं कौतुक अभिनेते नाना पाटेकर यांनी केलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शांत राहून आपलं काम करतात. एखादी गोष्ट चुकली तर तेवढीच व्यवस्थित सांगतात. ते खरोखर चांगले नेते असून, त्यांनी केलेलं काम जनतेसमोर आणण्याची गरज असल्याचंही नाना पाटेकर म्हणालेत.

पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद देऊ नका. म्हणजे कोणीही पक्ष बदलणार नाही. पक्ष बदलायला काही तरी नियम असायला पाहिजेत. किमान शिक्षणाची तरी अट पाहिजे, असंही नाना पाटेकरांनी अधोरेखित केलंय. आम्हाला अधिक प्रसिद्धी मिळते. परंतु राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवलीय.

- Advertisement -

दरम्यान, नाना पाटेकर यांनी कोरोनाबाबतही आपले मत व्यक्त केलेय. “कोरोनाचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत. कोविडच्या काळात नाती समजली. कोरोनाने सर्वांनाच जमिनीवर आणलंय. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. आपण सर्वांनी स्वतःहून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे आवाहन नाना पाटेकरांनी केले.

विशेष म्हणजे नाना पाटेकर यांच्याकडून खासदार अमोल कोल्हे यांची पाठराखण करण्यात आलीय. “अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. 30 वर्षांपूर्वी मीसुद्धा नथुराम गोडसेची भूमिका केली होती. मी भूमिका केली म्हणजे मी त्यांचं समर्थन करत नाही. मी गोडसेची भूमिका का केली, ते माझं उपजीविकेचे साधन आहे, यात माझी काय चूक आहे? असा प्रश्न उपस्थित करत नाना पाटेकर म्हणालेत.

- Advertisement -

हेही वाचाः Mumbai Fire : मुंबईतील ताडदेव इमारत आग दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -