घरताज्या घडामोडीकोरोना कामं, शेतकऱ्यांच्या मदतीत अडचणी नको, अजितदादांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

कोरोना कामं, शेतकऱ्यांच्या मदतीत अडचणी नको, अजितदादांच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना

Subscribe

एखादा अधिकारी हयगय करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश

राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहेत. अशा जिल्ह्यांत दौरे सुरु करण्यात आले आहेत. बीड जिल्हा, उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतला आहे. कोविडच्या विषाणूच्या प्रादुर्भावाचा आढावा घेत असताना जिल्ह्याक राज्य सरकारकडून सर्व गोष्टी योग्यवेळेत मिळत आहेत का? कर्मचारी व्यवस्थित उपलब्ध आहेत का? औषध पुरवठा, रुग्णवाहिका व्यवस्थित आहे का? तिसऱ्या लाटेची काय तयारी केली आहे. ऑक्सिजन प्लांट उभे राहिले आहे का? त्यात काही कमतरता आहे का? तिथे विज वेळेत मिळत आहे का? किंवा जिल्ह्यांत वैद्यकीय बेड किती उपलब्ध आहेत. व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड, लहान मुलाचे व्हेंटिलेटर बेडची संख्या, अत्याधुनिक व्हेंटिलेटर असले पाहिजे असे काही वैद्यकीय तज्ञांनी सांगितले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

राज्यात मधल्या काळात रेमडेसिवीरचा तुटवडा होता परंतु आता मुबलक प्रमाणात आहेत. इतर औषधांची अडचण नाही परंतु ब्लॅक फंगसच्या आजाराने डोकं काढलं आहे त्या इंजेक्शनचा तुटवडा संपुर्ण देशपातळीवर आहे. त्याचा फटका काही प्रमाणात वेगळेवेगळ्या राज्यांना बसतो आहे. हा फटका बसू नये यासाठी राज्यातील रुग्णांचा आढावा घेऊन रुग्णालयांना मार्ग काढून घेत असतो. अशी माहिती अजित पवार यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

आमदारांना निधीची तरतूद 

कोरोना काळात प्रत्येक आमदारांना १ कोटी निधी खर्च करण्यासाठी दिले आहेत. त्यातील बहुतांश आमदारांनी म्हटलं आहे की, निधी संपुर्ण खर्च झाला आहे तसेच अजून निधीची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा विषय मांडण्यात आला आहे. चर्चा करुन हा निर्णय घेतला जाईल. आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना मंजूर करुन दिलेला निधी आहे. यामुळं हा निधी कसा खर्च करायचा हे त्यांच्यावर आहे.

कामात अडचणी येऊ देऊ नका 

उस्मानाबाद जिल्ह्यात ८ तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यात ऑक्सिजन प्लांट आहे का? तसेच या जिल्ह्यात जो प्रमुख रुग्णालय आहे या रुग्णालयात किती ताकदीचे ऑक्सिजन प्लांट उभं कराव लागणार आहे. याचा आढावा घेण्यात आला आहे. विज संदर्भात जसे प्रशासनाला सुचना देण्यात आल्या आहेत की, कोरोनाच्या संदर्भात जे काम होत असेल त्या कामांना सहकार्य करावे, जिथे वीज नसेल तिथे वीज देण्यात यावी. पाण्याची अडचण, रस्त्याची अडचण असे होऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

सर्व रुग्णालयांत सरकारी ऑडीटर

राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये सरकारी ऑडिटर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर ऑडिटर नसल्यामुळे जिथे जिथे कर्मचाऱ्यांना काम नाही, शाळा सुरु नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना काम नाही आहे. अशा कर्मचाऱ्यांना प्रत्येक रुग्णालयात ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक रुग्णालयात ऑडिटर नेमायला सांगितले आहे. प्रत्येक रुग्णाचे बिल हा ऑडिटर ठरवणार आहे. राज्य सरकारने दर निश्चित केले आहेत. रुग्णालया हा ऑडिटर बसलाच पाहिजे त्याला सुट्टी असेल तर दुसऱ्याला बसवण्याच्या सूचना कलेक्टर यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यातील कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना

कोरोना चाचण्या वाढवण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यांत जरा पॉझिटिव्हचे प्रमाण कमी व्हायला लागले की नागरिक काळजी घेत नाहीत, फिरत असतात यामुळे टेस्टिंग वाढवत राहिले पाहिजे, मास्क नाही वापरले तर दंड आकारला पाहिजे अशा सूचना पोलिसांना दिल्या आहेत.

खरिप पेरणी आढावा

बीडमध्ये यावर्षी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. बीड आणि उस्माना जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून बियाण्यांची मागणी वाढली आहे. काही ठिकाणी बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे कृषीविभागाशी शनिवारी बैठक घेणार आहे. कलेक्टरांना सांगितले आहे की, १५ जूलैपर्यंत पिक कर्ज ० टक्के व्याजाने उपलब्ध करुन द्या, पिक कर्ज उपलब्ध करत असताना महाराष्ट्र ग्रामीण बॅंक, खासगी, राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँका यांना उद्धिष्ठ ठरवून दिले आहे. साधारण खरीपाचे १५४० कोटी रुपये उद्धिष्ठ ठरवून दिले आहे. हे उद्धिष्ठ गाठण्यासाठी बैठका घेण्याच्या सूचना कलेक्टरांना दिल्या आहेत. यामध्ये एखादा अधिकारी हयगय करत असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -