मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडल्याची माहिती माध्यमातून समोर येत आहे. राज्यातील मंत्र्यांची शुक्रवारी एक बैठक झाली. यात सर्वच मंत्र्यांनी विविध मुद्यांवर चर्चा सुरू असतानाच ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवारांनी बैठकीत उपस्थित केला. ठाण्यात एवढे मृत्यू कसे, असा प्रश्न अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला. कळवा रुग्णालयातील घटना ही गंभीर असून त्यांची काळजी घेतली पाहिजे, असे ही अजित पवार म्हणाले. यामुळे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यात वाद झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप केल्यानंतर विषय थांबला खरा. पण येत्या काळात मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्यातील वादाचे काय पडसाद उमटणार याकडे सर्वाचे लक्ष लागेल आहे.
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न केल्याने उपस्थित सर्व मंत्री अवाक् झाल्याची माहिती मिळाली आहे. खुद्द मुख्यमंत्री देखील अजित पवारांच्या प्रश्नांने आश्चर्यचकीत झाले. यानंतर मुख्यमंत्री अजित पवारांना ठाण्याच्या रुग्णालयाच्या घटनेची माहिती दिली. पण मुख्यमंत्र्यांना प्रश्न केल्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी अजित पवारांच्या या वागण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी महाविकास आघाडी आणि शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतरही अजित पवार यांची दादागिरी सुरूच आहे, अशा चर्चा शिंदे गटाच्या आमदारांमध्ये रंगल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा – ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील अधिष्ठातांसह सर्व डॉक्टरांची झाली चौकशी
फडणवीसांची मध्यस्थी
अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केल्यानंतर त्यांनी सर्व घटनेची माहिती दिली. यानंत बैठकीत वातावरण तापल्याचे फडणवीसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मध्यस्थी करत ठाण्यातील विषयाला बगल दिली. पण यामुळे आगामी काळात अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात मोठी दरी निर्माण होईल का?, की एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार हे मुख्यमंत्री होणार का?,यासारख्य अनेक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहेत.
- Advertisement -
- Advertisement -