घरमहाराष्ट्रBreaking : लोकसभेच्या 'या' जागा अजित पवार गट लढवणारच; कर्जत शिबिरातून अजित...

Breaking : लोकसभेच्या ‘या’ जागा अजित पवार गट लढवणारच; कर्जत शिबिरातून अजित पवारांची घोषणा

Subscribe

कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर पार पडत आहे. या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. अजित पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठे भाष्य करत कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

रायगड : कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर पार पडत आहे. या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे. या शिबिरामध्ये अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून भाष्य करत उपस्थित पदाधिकाऱ्यांना, नेत्यांना आणि पक्षातील सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांना सूचना केल्या. महत्त्वाची बाब म्हणजे या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी लोकसभेच्या काही जागांवर दावा करत त्या लोकसभेतून अजित पवार गटाचा उमेदवार उभा करणार असल्याचे जाहीर केले आहे. जागा वाटपाबाबत महायुतीत अद्याप तरी कोणतीही चर्चा झालेली नाही. मात्र, अजित पवारांनी लोकसभेच्या निवडणुकीबाबत मोठे भाष्य करत कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत. (Ajit Pawar’s group will contest ‘these’ Lok Sabha seats)

हेही वाचा – NCP vs NCP : ‘तुम्हीही चार वेळा भाजपसोबत बोलणी केली ते चालतं!’; भुजबळांचा शरद पवारांवर निशाणा 

- Advertisement -

कर्जतमधील शिबिरात अजित पवार म्हणाले की, मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभेची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे. लोकसभेच्या निवडणुकीत एनडीएचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. महाराष्ट्रातून 48 खासदार निवडून आणायचे आहेत. बारामती, शिरूर, सातारा, रायगड या जागा आपण निवडणार आहोत.पण त्याबरोबर ठाकरे गटाकडे ज्या जागा आहेत, त्यातल्याही काही जागा आपण लढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जागावाटपावर प्राथमिक चर्चा झाली आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर यावर सविस्तर चर्चा करण्याचे आपले ठरले आहे. इतर जागांसंदर्भात आपण शिंदे, फडणवीसांशी चर्चा करून लवकरच निर्णय जाहीर करू. जागावाटपासंदर्भात या सगळ्यांशी प्राथमिक चर्चा झाली आहे. आपल्या कार्यकर्त्याची ताकद पाहून आपण त्यांची निवड करणार आहोत, अशी महत्त्वाची माहिती पवारांनी दिली.

युतीत सत्तेत जाण्याआधी अजित पवारांवर भाजपाने घोटाळ्यांचे आरोप केले होते. आता याच मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. या टीकेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, काही आमच्यावर आरोप करतात की यांच्यावर केसेस होत्या त्या थांबाव्यात म्हणून हे गेले. आमच्यापैकी काहींनी 1999 पासून बहुतेक मंत्रीमंडळांत काम केले आहे. त्यामुळे आमच्यावर आरोप झाले. पण आरोप झाले म्हणजे ते सिद्धही व्हायला पाहिजे असतात. माझ्यावर झालेल्या आरोपांमुळे जलसंपदा विकासकामांची गती रेंगाळली. तेव्हा मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आले. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली 5 तज्ज्ञांची समिती होती. तेव्हाचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनीच नावे दिली होती. चितळेंचा अहवाल आला. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी त्या अहवालाला मंत्रीमंडळातमान्यता दिली नाही.

- Advertisement -

मी आज 32 वर्ष काम करत आहे. त्यामुळे काही अपवाद वगळता मंत्रीमंडळात काम करतोय. 12-12-2012 ला राज्यात सातत्याने भारनियमन होते त्यावेळी मी सांगितले होते की त्यातून मुक्त करणार. त्यानुसार मी मुक्त केले होते. आम्ही बोललो तसे वागतो आणि करतो. त्यामुळे मी कमीटमेंट पाळणारा नेता आहे. माझ्याकडे जीएसटी विभाग देखील होता. माझ्यावर आजपर्यंत कुठल्याही डीपीसीसंदर्भात आरोप नाही. काम व्हावी हीच कार्यकर्त्यांची अपेक्षा असते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच अजित पवार यांना भेटण्यासाठी पक्षाच्या नेत्यांना, मंत्र्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येत होते. त्यानुसार आता मंत्रालयात भेटीसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना प्राधान्य देण्यात येणार आहे. आमदार यांच्यानंतर मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महत्वाचे असणार आहे, असे अजित पवार यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -