पुणे : यंदा दिवाळी पवार कुटुंबिय यांच्या दिवाळीची सुरुवात बारामतीतून न होता. प्रतापराव पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी सर्व पवार कुटुंबिय एकत्र आले होते. यावेळी सर्व पवार कुटुंबियांच्या खास स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दादाची तब्येत अजून बरी झालेली नाही, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना केली होती.
दादांना डेंग्यू झाला होता आणि आज काय चर्चा झाली, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादाची तब्येत अजून बरी झालेली नाही. दादाचे रिपोर्ट जर नॉर्मल असले तरी प्लेटलेट्स बघावे लागते. बऱ्याच लोकांना पोस्ट डेंग्यूचा जास्त त्रास होतो. मला काही वर्षापूर्वी डेंग्यू झाला होता. त्यामुळे डोंग्यूनंतरची काळजी महत्त्वाची असते.”
या कार्यक्रमानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “दरवर्षी बारामतीला संपूर्ण कुटुंब बारामतीला जमते. पण यंदा प्रतापराव पवार यांच्या पतीने त्यांची तब्यात या वर्षी बरी नाही. त्यामुळे ते दिवाळीसाठी बारामतीला येणार नाही. यामुळे काकींसाठी खास स्नेहभोजना कार्यक्रम येथे ठेवला होता. आमच्या दिवाळींची सुरुवात प्रतापराव पवार यांच्या घरातून झाली.”
हेही वाचा – पवार कुटुंब एकत्र; अजित पवारांसोबत झालेल्या भेटीवर शरद पवारांनी एका वाक्यात दिली प्रतिक्रिया
दादा दिल्लीला गेला, हे माहिती नाही
अजित पवार दिल्ली गेलेलत का?, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दादा दिल्ली गेले, हे मला माहिती नाही. हे फक्त कुटुंबिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता. दिल्लीमध्ये खूप प्रदूषण आहे. मी स्वत: दिल्लीत होते. दिल्लीचे प्रदूषण खूप वाईट आहे.
हेही वाचा – प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी…; सर्वोच्च न्यायालयाची ‘या’ राज्यांना ताकीद
दिल्लीमध्ये खूप प्रदूषण
दादा दिल्लीमध्ये अमित शाहांना भेटण्याची शक्यता आहे, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाले, “जो दिल्लीला जाईल आणि जो राहत आहे. प्रदूषणामुळे दिल्लीच्या शाळा बंद आहेत.” कोणाला भेटायचे आणि कोणाला नाही, याची पण खबरदारी घेईची का?, या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाले, “मला ते माहिती नाही, मला प्रदूषणाच्या हवेबद्दल माहिती आहे. कारण दिल्लीला शाळा बंद आहेत.