घरताज्या घडामोडीपुण्यातील पर्यटन स्थळांवरील गर्दीवर कडक कारवाई करा, अजित पवार यांच्या पोलिसांना सूचना

पुण्यातील पर्यटन स्थळांवरील गर्दीवर कडक कारवाई करा, अजित पवार यांच्या पोलिसांना सूचना

Subscribe

पुण्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने सुरु राहणार

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोविड चाईल्ड हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. मुलांना शासकीय संस्थेमध्ये एकूण ३४६ बेड आणि खासगी रुग्णालयात २६८७ बेड उपलब्ध करण्यात आला आहे. लहान मुलांना तिसऱ्या लाटेत असलेला धोका पाहून या बेडची उपलब्धता करण्यात आली आहे. पुण्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण एकूण १२३८ त्यातील ६०७ रुग्ण बरे झाले आहेत तर दुर्दैवाने १७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यातील मृत्यूदर कमी झाले आहे परंतु लोकांनी मास्क वापरण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील जनतेला आणि पुण्यातील लोकांना आवाहन आहे की, कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्यानंतरही मास्कचा वापर करा, काही लोकांनी पहिला आणि दुसरा डोस घेतला आणि मास्क लावण्यास टाळाटाळ केली. यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. काही लोकांचा दुर्दैवाने कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की, दोन्ही लसीचे डोस घेतले तरी मास्क, सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करावेच लागणार आहे.

- Advertisement -

पुण्यात कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे. पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर ५ टक्क्यांवर आला आहे. तर पिंपरी चिंचवडचा ५ टक्क्यांपेक्षा कमी झाला आहे. पुण्यात सध्या सुरु असलेले निर्बंध कायम ठेवण्यात येत आहेत. पुण्यात सायंकाळी ४ वाजेपर्यंत दुकाने उघडी राहणार आहेत. दुकानं बंद होत आहेत परंतु हातगाड्या सुरु राहत आहेत. यामुळे ४ नंतर हे सगळं बंद झाले पाहिजे. पर्यटनाची ठिकाणं सिंहगड, लोणावळा येथे गर्दी होऊन कोरोना वाढत असल्यामुळे कोरोना निर्बंधांची कडक अमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस आणि सीपी यांना पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तसेच पर्यटकांकडून दंड आकारण्याबाबतच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दोघांनी नेतृत्व करावं

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांनी म्हटलंय की भुजबळ यांनी नेतृत्व करावं आम्ही त्यांच्यासोबत आहोत असा प्रश्न अजितदादांना विचारला असता त्यांनी म्हटलं की, टोलवा टोलवी करण्यापेक्षा सामोपचाराने कशाप्रकारे समाजाचा प्रश्न सोडवणं गरजेचे आहे. राज्य सरकारच्या हातातील गोष्टी राज्य सरकार करत असेल केंद्राचे काम केंद्राने करावं असे म्हणत केंद्र सरकारचे काम राज्य सरकार करु शकत नाही. यापेक्षा दोघानी नेतृत्व करावं आणि काय करायचे आहे ते करावं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

- Advertisement -

मास्क वापरावा लागणार

ज्यावेळी एखाद्या ठिकाणी गर्दी होते कार्यक्र होतात मग कोरोनाचे प्रमाण वाढले, इज्रायल ने लसीकरण करुन मास्क मुक्त झाले परंतु त्यांना पुन्हा मास्क वापरावा लागला आहे. दोन्ही लस घेतल्या तरी मास्क वापरल पाहिजे गर्दी टाळली पाहिजे. टोकियोमध्ये फक्त खेळाडू आणि सहकारी असतील तर प्रेक्षक एकही राहणार नाही. राष्ट्र हिताचा निर्णय घेतात परंतु काहीजण पाळत नसल्यामुळे त्रास होत आहे. अशी प्रतिक्रिया कोरोना वाढीवर अजित पवार यांनी दिली आहे.

पेट्रोलवर कोणताही कर नाही

मी सरकारमध्ये आल्यावर त्याआधी फडणवीस याचे सरकार होते त्याकाळी जो काही दर होता त्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या अर्थसंकल्पात दर वाढवला नाही त्यांचेच दर आहे. केंद्र सरकार साडेतीन ते ४ लाख कोटी रुपये केंद्र सरकार घेत आहे केंद्राने कमी करावा. आताच्या काळात सव्वाकोटी लाख नुकसानीत आहे. सगळ्या विभागांना निधी द्यावा लागतो त्यामुळे काल २३ हजार कोटी रुपयांचा पुरवणी मागण्या केल्या आहेत. लोकांना सुविधा देत असताना उत्पन्न कमी करत गेलं तर त्यावर परिणाम होईल

सहकाराच्या मागचा हेतू अस्पष्ट

सहकाराच्या बाबतीत १०० वर्षांपुर्वी सहकार अस्तित्वात आल आहे. केंद्राने केंद्राचं काम कराव आणि राज्याने राज्याचे काम करावं असे अजित पवार यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं सहकार खातं आणलं या मागचा हेतू अद्याप अस्पष्ट आहे परंतु त्यांनी नियम बनवल्यानंतर त्यांचे धोरण कळेल. सहकार विभाग राज्याच्या आखत्यारित आहे त्यामुळे राज्यानेच त्याचे काम पाहावं. देशाचा विचार करता सहकार चळवळ हे महाराष्ट्रात वाढली आहे. काही लोकांच्या चूकीमुळे संपुर्ण सहकार चुकीचं आहे असं समजण्याचं कारण नाही.

फडणवीसांच्या बोलण्यात तथ्य नाही

तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहात काय काय घडलं हे त्यांनी रेकॉर्डवर आणलं आहे. त्यांनी दालनातील गोष्टीही सांगितल्या आहेत. एका सदस्याने माईक खेचला एकाने राजदंड पळवला आहे. न्यायालयाने सांगितले आहे की, अशा लोकप्रतिनिधींवर कारवाई करण्यात यावी. आम्ही मागील राजकीय कारकिर्दीत अनेक गोंधळ पाहिले आहेत. आमचेही सदस्य निलंबित करण्यात आले होते तेव्हा हल्लाबोल आंदोलनही केले होते. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर सगळं सांगितले आहे. यामुळे फडणवीसांच्या आरोपामध्ये तथ्य नसल्याचे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -