घरताज्या घडामोडीनाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले स्वप्न बघणं...

नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले स्वप्न बघणं…

Subscribe

तू ज्या चॅनलमध्ये काम करतो तिथं तुला मुख्य संपादक व्हावं असं वाटत नाही का?

महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच पक्षश्रेष्ठींनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यावर स्विकारेन असेही म्हटलं आहे. यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता. स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाही. काँग्रेसनं कुणाबरोबर निवडणुका लढवाव्या हा अधिकार सोनिया गांधींचा आहे. अजित पवार नेहमी आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे चर्चेत असतात यावेळी त्यांना पत्रकाराने प्रश्न विचारल्यावर तुला तुज्या कंपनीत संपादक व्हावं असं वाटत नाही का? अशा शब्दात उत्तर दिलं आहे.

अजित पवार कोल्हापुर दौऱ्यावर होते. यावेळी कोल्हापुरात अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. स्वप्न बघँ हा काही गुन्हा नाही. आमची आघाडी असली तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे. काँग्रेसनं कोणासोबत निवडणूक लढवायची किंवा काय हा अधिकार सोनिया गांधींचा आहे. राष्ट्रवादीनं कुणासोबत आघाडी करावी न करावी हा अधिकार पवार साहेबांचा आहे. शिवसेनाच अधिकार उद्धव ठाकरेंना आहे असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

अजित पवार यांना नाना पटोलेच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्याबाबत प्रश्न केला असता अजितदादांनी आपल्या शैलित उत्तर दिले आहे. तू ज्या चॅनलमध्ये काम करतो तिथं तुला मुख्य संपादक व्हावं असं वाटत नाही का? असा सवाल अजित पवार यांनी केला यामुळे एकच हशा पिकला होता.

नाना पटोले काय म्हणाले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विदर्भ दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केलं आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका काँग्रेसनं स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. तसेच विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूकाही स्वबळावर लढवाव्यात अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेत येईल असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस हायकमांड ठरवेल कोण मुख्यमंत्री होणार परंतु मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिल्यास स्विकारेल असे वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे.

- Advertisement -

तसेच नाना पटोले यांनी सध्या पाच वर्ष महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदी उद्धव ठाकरेच असतील असे म्हटले आहे. मुख्यमंत्रिपदाच्याबाबत कोणाताही फॉर्म्युला ठरलेला नाही. पाच वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील आणि याला काँग्रेसचा संपुर्ण पाठिंबा राहील असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -