त्यांना जे बोलायचे ते बोलू द्या, आम्ही विकासावर बोलणार, अजित पवारांची ‘राज’सभेवर प्रतिक्रिया

Ajit Pawar said that he will withdraw the charges in the Punatamba agitation case

राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आपल्या भाषणातून शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांची क्रेडिबिलीटी घालवत असल्याची टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्यांना जे बोलायचे आहे ते त्यांना बोलू द्या आम्ही विकासावर बोलणार असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवारांना राज ठाकरेंच्या टीकेबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की, त्यांना जे बोलायचे आहे ते त्यांनी बोलावं, आम्हाला विकासाच्या मुद्द्यावर बोलायचे आहे. मी कालसुद्धा जळगाव, शहापूर, डहाणू सिंदखेडराजा ज्या ज्या भागात गेलो तिथे माझी भूमिका तीच आहे. ज्याच्यातून महाराष्ट्रातील मुलांना आणि मुलींना रोजगार मिळणार असेल. तसेच ज्याच्यातून जातीय सलोखा निर्माण होणार आहे. ज्याच्यातून कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस वर्गाला मदत होणार आहे. ह्या गोष्टीला आपण जास्त महत्त्व देऊ ना असे अजित पवार म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी आंदोलन अर्धवट सोडल्याचं एक उदाहरण दाखवा. असे म्हणत मनसेच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातील ६४ ते ७० टोलनाके मनसेमुळं बंद झाले. यांची काहीच जबाबदारी नाही. बाकीच्या पक्षांची काहीच जबाबदारी नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत बॉलिवडूमध्ये पाकिस्तानी कलावंत येत होते त्यांना देशातून हाकलून दिलं, त्यावेळी हिंदुत्वाची पक पक करणारे कुठं होते. रझा अकादमीच्या मोर्चावेळी आमच्या भगिनींवर हात टाकला होता. त्यावेळी मनसेनं मोर्चा काढला असे सांगत राज ठाकरेंनी अजित पवार आणि विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

शरद पवार बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवतायत – राज

कहर म्हणजे शरद पवार म्हणतायत आम्ही सकाळी भांडायचो आणि संध्याकाळी जेवायला एकत्र बसायचो. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची क्रेडिबिलिटी घालवताय. शिवसेनेला कळत नाहीये की तुम्ही कुणाबरोबर राहात आहात. लोकांना वाटेल यांचं खोटं खोटं भांडण चालायचं. बाळासाहेबांची क्रेडिबिलीटी घालवाताय तुम्ही असे राज ठाकरे म्हणाले आहेत.


हेही वाचा : औरंगजेब कबर ते आदित्य ठाकरेंपर्यंत राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे