घरमहाराष्ट्रपुणेअसल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, अजित पवारांचे अब्दुल सत्तारांच्या टीकेला...

असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, अजित पवारांचे अब्दुल सत्तारांच्या टीकेला उत्तर

Subscribe

पुणे- राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली . या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उत्तर दिले आहे. यावेळी त्यांनी असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही, असा पलटवार कृषी मंत्री अब्दुल सत्तारांवर केला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवार हे मुंडकी खाणारे डायानासोर होते, असा घणाघाती हल्ला राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केला होता. त्यावर अजित पवार यांनी असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही. माझी मीडियाला हातजोडून विनंती आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. महागाईचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा होऊ नये म्हणून कोणी तरी काही तरी बोलत असते. त्यावर फोकस करू नका. ते बंद केले पाहिजे. वेदांतासारखा प्रकल्प गेला. दोन लाख लोक तरुण तरुणींना नोकरीला मुकावे लागले आहे. इतर प्रश्नांची सोडवणूक करा, असे माझे सत्ताधारी पक्षाला आवाहन आहे, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

छगन भुजबळ यांचे मत वैयक्तिक –

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलेले सरस्वतीबाबतचे विधान त्यांचे वैयक्तिक मत आहे. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली आहे, असा खुलासा अजितदादांनी केला.

- Advertisement -

घोषणा देणाऱ्या आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करा –

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडल्यानंतर या घटनेचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.यावेळी महाराष्ट्रात आणि देशात कुठेही पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देता कामा नये, अशा आरोपींवर लवकर कारवाई झाली पाहिजे, यासंदर्भातील तपास सरकारने लवकरात लवकर संपवावा आणि कारवाई करण्यात यावी. हा तपास लांबवण्यात काही कारण नाही असे मत व्यक्त करत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -