काटेवाडी : राज्य सरकारने जालन्यात आंदोलनकर्त्यांवर केलेला लाठीचार्ज हा प्रचंड चीड आणणारा आणि मराठा समाजाच्या भावना दुखवणार असल्यामुळे आंदोलन करत आहोत, अशा शब्दात संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे यांनी राज्य सरकारवर टीका केली. बारामती तालुक्यातील काटेवाड गावातील ग्रामस्थ आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जालन्यातील आंदोलकावरील झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
बारामती इंदापुर रस्त्यावर एसटी स्टॅन्ड परिसरात एक मराठा, लाख मराठा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, च्या घोषणा देत काटेवाडी ग्रामस्थ, व सकल मराठा समाजाच्या वतीने बारामती इंदापुर रास्ता रोको करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी गावातील ग्रामस्थानी राज्य सरकार विरोधात आंदोलन केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज बुलढाण्यात ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण राज्याचे उपमुख्यमंत्री तब्यात खराब असल्याने बुलढाण्याच्या गेले नाही.
संभाजी बिग्रेडचे अमोल काटे म्हणाले, “जालनातील घटनेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जबाबदार असून या आंदोलकांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज लहान मुले, पुरुष महिला देखील सोडले नाही. आमचा पोलिसांवर राग नाही. कारण पोलिसांनी वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन केले आहे. आमचा राग हा आदेश देणाऱ्या वरिष्ठांविषयी आहे. गेल्या सात वर्षात राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजांनी आरक्षणांसाठी लाखोच्या संख्येने मोर्चे काढले होते. तेव्हा कोणताही गैरप्रकार घडला नाही. पोलिसांच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या ठिकाणच्या आंदोलनाच्या युवक महिलांवर गुन्हे देखील करण्याच आल्याची माहिती मिळाली असून या लाठीचार्ज हा राज्यभरात चीड आणणारा आहे. यामुळे मराठा समाजाच्या भावना देखील दुखावल्या आहेत. यामुळे आम्ही आंदोलन करत आहोत.”
हेही वाचा – Jalna Lathi Charge : ज्यांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते…; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल
जालन्याच्या घटनेवर मुख्यमंत्री म्हणाले…
जालनाच्या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज ‘शासन आपल्या दारी’ या कार्यक्रमा निमित्ताने बुलढाण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, “एकनाथ शिंदे म्हणाले की, जालनामध्ये परवा दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मला दु:ख झाले आहे, आपल्या सगळ्यांना दु:ख होणे स्वाभाविक आहे. परंतु त्याची कारणमीमांसा शोधण्याच्या ऐवजी याठिकाणी काही लोके येऊन गेले त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवली आहे. ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला ते लोके तिथे गळा काढायला आले होते. मग अशोक चव्हाण असतील, माजी मुख्यमंत्री असतील नाहीतर आणखी कोणी असेल. मला या विषयावर आपल्याला एवढंच सांगायचं आहे, आपल्या सरकारने 2014-2017 मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. 12 टक्के, 13 टक्के आरक्षण उच्च न्यायालयात टीकले, पण दुर्दैवाने ते सर्वाेच्च न्यायालयात गेले. त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार आले आणि त्याठिकाणी आरक्षण रद्द झाले.”