घरताज्या घडामोडीअजोय मेहतांचा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागार पदाचा राजीनामा

अजोय मेहतांचा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागार पदाचा राजीनामा

Subscribe

MahaRERA अध्यक्षपदी अजोय मेहता यांची नेमणुक

राज्याचे माजी मुख्य सचिव मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रमुख सल्लागार अजोय मेहता यांची नेमणुक महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटी (महारेरा) च्या अध्यक्षपदी करण्यात आली आहे. महारेरा अध्यक्षपदाच्या नेमणुकीसाठी तीन सदस्यीय समितीकडून अजोय मेहता यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ठाकरे सरकारकडून याबाबतचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामुळे अजोय मेहता यांचे विद्यमान पद असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागार पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रात रिअल इस्टेट लॉबीसाठी हा एक मोठा चेकमेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून देण्यात आला आहे असे बोलले जात आहे. अजय मेहता यांच्या राजीनाम्यानंतर आता मुख्यमंत्री कार्यालयात अतिमुख्य सचिव आशिष कुमार सिंह, विकास खारगे (प्रधान सचिव), आबासाहेब जराड (सचिव) असे तीन सचिव मुख्यमंत्र्यांच्या दिमतीला असतील.

महारेराच्या अध्यक्षपदी असलेल्या गौतम चॅटर्जी यांचा कार्यकाळ संपल्याने हे पद रिक्त झाले आहे. आता या पदावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असे अजोय मेहता यांची वर्णी लागली आहे. त्यामुळेच मुंबई महानगर क्षेत्रात रिअल इस्टेट बुममध्ये शिवसेनाही सक्रीय झाल्याची चर्चा आहे. अजोय मेहता यांनी राज्याच्या प्रशासनात अनेक महत्वाच्या पातळीवर काम केले आहे. माजी उपमुख्यमंत्री गोपिनाथ मुंडे यांचे प्रधान सचिव, केंद्रीय दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांचे स्वीय सहाय्यक तसेच राज्याच्या ऊर्जा विभागापासून, माहिती तंत्रज्ञान, पर्यावरण ते मुंबई महापालिका आयुक्त, राज्याचे मुख्य सचिव अशा अनेक जबाबदाऱ्यांमध्ये प्रशासकीय कारभाराचा हातखंडा असल्याचे अजोय मेहता यांनी आपल्या कामातून सिद्ध केले आहे. (CMO chief advisor Ajoy Mehta appointed as Chairman MahaRERA)

- Advertisement -

ajoy m

कोण आहेत अजोय मेहता ?

अजोय मेहता हे १९८४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. राज्याचे मुख्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाळ ३१ ऑक्टोबर २०१९ रोजी संपणार होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. दिलेली मुदतवाढ ३१ मार्च २०२० रोजी संपणार होती. मात्र कोरोनाचा काळ सुरू असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ दिली. मुख्य सचिव पदावरून निवृत्त झाल्यानंतर अजोय मेहता हे नऊ महिने त्याच पदावर कार्यरत राहिले. ३० जून २०२० रोजी मुदतवाढ संपण्या अगोदरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेहतांना मुख्यमंत्र्याचे मुख्य सल्लागार म्हणून जबाबदारी दिली. मेहता यांच्या नियुक्तीला कॉंग्रेसह राष्ट्रवादी कॉंग्रेसचाही विरोध होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची नियुक्ती करत दोन्ही घटक पक्षांना माझ्या कार्यलयात मी कुणाला नेमायचे हे मी ठरवणार याबाबत अप्रत्यक्ष सुतोवाच केले होते. अजोय मेहता यांनी आतापर्यंत राज्यातील महत्वाची धोरणे आणि विशेषतः कोरोना काळात आपल्या प्रशासकीय सेवेतील दांडगा अनुभव यातून राज्यासाठी अतिशय महत्वाचे असे योगदाने दिले आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -