Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र MahaRERA च्या अध्यक्षपदी अजोय मेहतांनी घेतली शपथ

MahaRERA च्या अध्यक्षपदी अजोय मेहतांनी घेतली शपथ

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेहता यांना महरेरा अध्यक्ष म्हणून शपथ दिली.

Related Story

- Advertisement -

माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सोमवारी महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे (महारेरा) अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मेहता यांना महरेरा अध्यक्ष म्हणून मंत्रालयात पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, महारेराचे सदस्य तथा माजी अपर मुख्य सचिव विजय सतबीर सिंग, महारेरा अपिलीय प्राधिकरणाचे सदस्य एस. एस. संधू, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, महारेराचे सचिव डॉ. वसंत प्रभू आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

…म्हणून अजोय मेहता अध्यक्षपदी?

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महारेराच्या अंतर्गत संपूर्ण रिअल इस्टेट आणि बिल्डर लॉबी यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी मेहता यांची अध्यक्षपदी निवड केल्याची चर्चा आहे. मेहता यांनी याआधी राज्याच्या प्रशासनात अनेक महत्वाच्या पातळीवर काम केले आहे. मेहता हे १९८४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी राज्याचे मुख्य सचिव म्हणून, तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले आहे.

अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा

- Advertisement -

महारेराच्या अध्यक्षपदी नेमणुकीसाठी तीन सदस्यीय समितीने मेहता यांचे नाव निश्चित केले होते. तीन सदस्यीय समितीमध्ये बॉम्बे हायकोर्टचे न्यायमूर्ती, गृहनिर्माण विभागातील सचिव, विधी व न्याय विभागाचे सचिव यांनी एकूण सहा नावांपैकी दोन नावे या पदासाठी निश्चित केली होती. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला.

- Advertisement -