घरताज्या घडामोडी'त्या' बोटीत तीन एके 47 गन आढळल्या; पोलीस अलर्ट मोडवर

‘त्या’ बोटीत तीन एके 47 गन आढळल्या; पोलीस अलर्ट मोडवर

Subscribe

श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री हरिहरेश्वर तीर्थक्षेत्री मंदिराच्या जवळच समुद्रामध्ये एक बेवारस बोटआढळून आली. सकाळी आठ वाजता स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले की या ठिकाणी कोणती तरी बोट उभी आहे. त्यानंतर त्या ठिकाणच्या पोलीस पाटलांनी श्रीवर्धन पोलीस ठाण्याला माहिती दिली. श्रीवर्धन पोलिसांचे पथक तातडीने त्या ठिकाणी रवाना झाले. सदर बोटीची झडती घेतली असता त्यामध्ये तीन एके 47 गन आढळून आल्या. तसेच काही कागदपत्रे देखील आढळून आली असून सदरची बोट ही यूकेमधील असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच यामध्ये काही छोटे-छोटे बॉक्स आहेत. त्यामध्ये सुद्धा काही वस्तू आहेत का? याबाबतही पोलीस खात्री करत आहेत.

भरडखोल समुद्र किनारी सुद्धा अशाच प्रकारची एक छोटी बोट आढळून आली असून ती अतिशय छोटी बोट आहे. त्यामध्ये फक्त लाईफ जॅकेट आढळून आले. हरिहरेश्वर येथे सापडलेली बोट व त्यामध्ये सापडलेली हत्यारे याबद्दल श्रीवर्धन तालुक्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले असून अनेक अफवा देखील पसरविल्या जात आहेत. उद्या दहीहंडीचा सण असून श्रीवर्धन तालुक्यात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

- Advertisement -

उद्या होणारा दहीहंडी सण व आगामी येणारा गणेशोत्सव याकाळात काही घातपात घडवण्याचा अतिरेक्यांचा डाव तर नाही ना? असा संशय अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. याबाबत पोलिसां जवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी फोन रिसिव्ह केले नाहीत. रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे श्रीवर्धन कडे येण्यासाठी निघाले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.


हेही वाचा : …ही कुठली पद्धत; चौकात आहात का तुम्ही?, नीलम गोऱ्हेंनी गुलाबराव पाटलांना झापले

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -