घरताज्या घडामोडीनागरी प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा : खैरे

नागरी प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा : खैरे

Subscribe

निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बैठक

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर युवक पदाधिकारयांनी शहरातील नागरी प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडविण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्याच्या सूचना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष आंबादास खैरे यांनी पदाधिकारयांना दिल्या. कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असून आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रणनिती ठरविण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये युवकांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होत असल्याने आगामी महापालिका निवडणुकीत युवकांना संधी उपलब्ध होणार आहे. परंतु जो पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आपले काम जनतेपर्यंत पोहचवून आपले नावलौकिक वाढवेल व बूथ कमिटी तयार करेल त्यालाच पक्ष संधी देण्यार असल्याचे संकेत यावेळी शहराध्यक्ष खैरे यांनी दिले. शहरात अनेक समस्या आहेत. त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ १.१ किलोमीटर स्मार्ट सिटीचा रस्ता बनविण्यात जवळपास तीन वर्षाचा कालावधी व १७ कोटीहून अधिक खर्च लागला. आता गर्दीच्या ठिकाणीचे रस्ते स्मार्ट सिटी कंपनीने खोदण्यास सुरवात केली असून यास किती कालावधी लागेल याचे उत्तर स्मार्ट सिटी कंपनी कडे नाही. शहरातील विविध भागातील रस्ते विकास कामांच्या नावाखाली खोदण्यात आले परंतु काम अर्धवट सोडून दिले असून पावसाळ्यात मातीमुळे पुन्हा खड्डे होणार आहे. यामुळे जनतेत तीव्र नाराजी असल्याने जनतेच्या समस्यांसाठी आंदोलन करावे अशी सूचना यावेळी त्यांनी केली.

- Advertisement -

यावेळी जय कोतवाल, नितीन निगळ, राहुल तुपे, सोनू वायकर, विशाल डोखे,निलेश भंदुरे, सागर बेदरकर, संतोष जगताप, राहुल कमानकर, कल्पेश कांडेकर, डॉ.संदीप चव्हाण, किरण पानकर, संतोष भुजबळ, नवराज रामराजे, रेहान शेख, हर्शल चव्हाण, विशाल माळेकर, अविनाश मालुंजकर, अमोल सूर्यवंशी, प्रश्नांत नवले, संतोष गोवर्धने, कुणाल धस्ते, गणेश खोडे, चेतन दुखे, स्वराज हाके, अजय बागुल, सचिन मोगल, मिलिंद सोळंकी, गणेश गरगटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -