महापुरुषांचा वारसा जपणाऱ्या वर्धा नगरीत साहित्यिकांची मांदियाळी, आजपासून 96वे मराठी साहित्य संमेलन

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2023 begins today in wardha wooden gandhi charkha

स्वातंत्र्यलढ्यापासून सामाजिक, सांस्कृतिक, वाड्मयीन चळवळींचे माहेरघर आणि महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या वर्धा नगरीत यंदाचे 96 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यप्रेमी वर्ध्यात दाखल होत आहेत. 3 ते 5 फेब्रुवारीपर्यंत हे साहित्य संमेलन रंगणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत.

स्‍वावलंबी शिक्षण मंडळाच्या पटांगणात या साहित्‍य संमेलन होत आहे याच पटांगणात 1969 साली म्हणजे 53 वर्षांपूर्वी साहित्य संमलेन पार पडलं होतं. या पटांगणाला महात्मा गांधी साहित्यनगरी असं नाव देण्यात आले आहे. तर मुख्य सभामंडपाला आचार्य विनोबा भावे यांच तर मुख्य व्यासपीठाला प्राचार्य राम शेवाळकर यांचे नाव देण्यात आलं आहे.

उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्यांचा प्रत्यक्ष चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे. वर्ध्यातील गोपुरीमधील ग्रामोद्योग भांडारात हे चरखे तयार करण्यात आले आहेत. चरखा हा केवळ प्रतिकात्मक राहू नये त्यामुळे प्रत्यक्ष सूत कताई पेटी चरखा भेट म्हणून दिला जाणार आहे. आज (3 फेब्रुवारी) सकाळी 10.30 वाजता या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटन आणि समारोपीय कार्यक्रमाला येणार्‍या सर्व प्रमुख पाहुण्यांचा चरखा देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

उद्घाटन आणि समारोप या दोन्ही कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री आणि संमेलनाचे मार्गदर्शक नितीन गडकरी, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, स्वागताध्यक्ष दत्ता मेघे आदी जवळपास 19 प्रमुख पाहुणे राहणार आहेत. या सर्वांना प्रत्यक्ष सूत कताईचा चरखा भेट देण्यात येणार आहे.

दरम्यान संमेलनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील महात्म गांधीजींच्या सूत काताईची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. या संमेलनातील पुस्तकांच्या प्रकाशनासाठी स्वतंत्र मंडप उभारला आहे. या संमेलनात जवळपास 100 पुस्तकांचे प्रकाशन होण्याचा अंदाज आहे. यातील बाल मंचदेखील आकर्षणाचा विषय आहे.


खुशखबर! CSMT वर ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ची एन्ट्री; रचला ‘हा’ इतिहास