मराठी साहित्य संमेलनातील मुख्यमंत्री शिंदेंच्या भाषणावेळी गदारोळ; ‘वेगळ्या विदर्भा’च्या घोषणा

akhil bharatiya marathi sahitya sammelan 2023 wardha cm eknath shinde separate vidarbha state protest

वर्धा नगरीत 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या साहित्य संमेलनासाठी राज्यभरातून साहित्यप्रेमी वर्ध्यात दाखल झाले आहेत. मात्र या साहित्य संमेलनाचा पहिलाच दिवस मोठ्या वादात गेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अधिवेशानाचे उद्धाटन झाले. या उद्धाटनानंतर मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असताना विदर्भवादी लोकांनी मोठा गोंधळ घालत वेगळ्या विदर्भाची मागणी केली.

मराठी साहित्य संमेलनामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. या संमेलनाचं उद्धाटन त्यांच्या हस्ते झालं. मात्र त्यांचे भाषण सुरु असताना काही विदर्भवादी लोकांनी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांच्या भाषणातचं त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. यावेळी मुख्यमंत्र्यांना भाषण काही वेळ थांबवाव लागलं. मात्र सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी घोषणाबाजी देणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. ३ विदर्भवाद्यांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. ज्यात पुरुषांसह काही महिलांचाही सहभाग आहे. यानंतर भाषेजवळील वातावरण शांत करण्यात आलं. या विदर्भवाद्यांची दखल मुख्यमंत्री शिंदेंनी आपल्या भाषणातही घेतली.

यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे. आपण त्यांचे म्हणणे ऐकून घेऊ, हे साहित्य संमेलन आहे. आपले विषय मांडण्यासाठी वेगवेगळे व्यासपीठ आहेत. या मान्यवरांचे स्वागत आपण केलं पाहिजे. सरकारची दारं 24 तास खुली आहेत. कुणाचाही अनादर करण्याचा आमचा हेतू नाही. आज हे साहित्यिकांचे राज्य आहे. कृपया कोणी गोंधळ घालू नये.

गोंधळ घालणाऱ्या विदर्भावाद्यांनी स्वतंत्र्य विदर्भाची मागणी लावून धरली. विदर्भावर ऊर्जा, पाणी, निधी प्रत्येक गोष्टीत अन्याय होत आहे, असं आंदोलकाचं मत आहे. मात्र परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी आंदोलक विदर्भवाद्यांना ताब्यात घेतलं आहे.


हेही वाचा : महापुरुषांचा वारसा जपणाऱ्या वर्धा नगरीत साहित्यिकांची मांदियाळी, आजपासून 96वे मराठी साहित्य संमेलन