घरमहाराष्ट्रराष्ट्रपती राजवटीचा शतक महोत्सवी 'नाट्य संमेलना'ला फटका

राष्ट्रपती राजवटीचा शतक महोत्सवी ‘नाट्य संमेलना’ला फटका

Subscribe

राज्यातील राष्ट्रपती राजवटचा फटका 'नाट्य संमेलना'ला बसण्याची शक्यता असून यंदाचे शतक महोत्सवी वर्ष पुढे ढकलण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात सरकार स्थापन करण्यात सर्वच पक्ष अपयशी ठरल्यानंतर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. निवडणूकपूर्वी युती असलेल्या भाजप – शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळूनही त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. मात्र, याचा फटका ‘नाट्य संमेलना’ला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलली जाणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे यंदाचे नाट्यसंमेलनाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे.

५० लाखांचे अनुदान दिले जाते

नाट्यमंसेलनात राजकीय नेत्यांची भूमिका महत्त्वाची असते. या नाट्यसंमेलमनाकरता राज्य सरकारकडून दरवर्षी ५० लाखांचे अनुदान दिले जाते. मात्र, नाट्यसंमेलनासाठी राज्य सरकारकडून मिळणारा निधी राष्ट्रपती राजवट असल्यामुळे उशीर होऊ शकतो. त्यामुळे याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे प्रसाद कांबळी यांनी नाट्यसंमेलनाची तारीख पुढे ढकलणार असल्याचे वृत्त फेटाळले आहे. ‘नाट्यसंमेनलाची जागा, तसेच अध्यक्षपदी कोण असणार, त्याची वेळ या सगळ्या गोष्टींबद्दल अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही त्यामुळे ते पुढे ढकलण्याचा कोणताच प्रश्नच नसल्याचे,’ प्रसाद कांबळी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – काँग्रेस-राष्ट्रवादीची बैठक रद्द; अजित पवार म्हणाले, ‘नो कॉमेंट्स’!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -