Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिकमध्ये साहित्य संमेलन तूर्तास अशक्यच

नाशिकमध्ये साहित्य संमेलन तूर्तास अशक्यच

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव-ढाले पाटील यांच्या पत्रावर पालकमंत्री भुजबळांची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

नाशिकमध्ये नियोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करणे तूर्तास अशक्यच असल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळांनी दिली.

साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव-ढाले पाटील यांनी पालकमंत्री भुजबळांनी पत्र पाठवून संमेलन होणे शक्य आहे का आणि तारीख कळवा, असे पत्र पाठवले आहे. त्यावर भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून नाशिककर आताकुठे सावरत आहेत. त्यात पुढील महिन्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जाते आहे. संमेलनामुळे हजार-दोन हजार व्यक्ती एकत्र येतील आणि ते सध्याच्या परिस्थितीत शक्य नाही. आम्हीदेखील ओबीसी आंदोलन थांबवले आहे. त्यामुळे तूर्तास साहित्य संमेलन आयोजित करणे अशक्य असल्याचे भुजबळांनी सांगितले.

- Advertisement -