घरमहाराष्ट्रअकलूज ग्रामपंचायत होणार नगरपरिषद; शिंदेंनी अजितदादांचा विरोध डावलून निर्णय घेतल्याची चर्चा

अकलूज ग्रामपंचायत होणार नगरपरिषद; शिंदेंनी अजितदादांचा विरोध डावलून निर्णय घेतल्याची चर्चा

Subscribe

नातेपुते ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपंचायतीत होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेली अकलूज ग्रामपंचायतीचं नगरपरिषदेत रुपांतर होणार आहे. यासंदर्भातील अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीसह काढली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विरोध असताना देखील राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय.

उच्च न्यायालयाने १७ जुलैला तीन आठवड्यात याबाबत अध्यादेश काढावा, असा आदेश राज्य सरकारला दिला होता. अखेर अकलूज ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपरिषदेत करण्याची अधिसूचना शासनाने काढली. या अधिसूचनेनुसार अकलूज ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपरिषदेमध्ये तर नातेपुते ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपंचायतीत होणार आहे. दरम्यान, यासाठी अकलूज-माळेवाडी आणि नातेपुते ग्रामस्थांनी आंदोलन देखील केलं होतं. अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं आहे.

- Advertisement -

दरम्यान, या निर्णयाला थोडा उशिर झाला आहे. कारण याबाबत १९ सप्टेंबर २०१९ रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले आणि अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड. अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला मंगळवारी न्याय मिळाला. हा प्रश्न सहमतीने सोडवला जावा यासाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना समक्ष भेटून विनंतीही केली होती.

अजितदादांचा विरोध डावलून निर्णय घेतल्याची चर्चा

विजयसिंह मोहिते पाटील यांनी अकलूज ग्रामपंचायतीचं रुपांतर नगरपरिषदेत होण्यासाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले होते. त्यानंतर मोहिते पाटील भाजपमध्ये गेल्यामुळे ती नगरपरिषद होऊ नये यासाठी राष्ट्रवादीने कंबर कसली होती, अशी चर्चा होती. मात्र, अकलूज, नातेपुतेमधील शिवसेना, काँग्रेस आणि भाजप अशी ताकद एकत्र होती. यात शिवसेनेने पुढाकार घेतला होता. दरम्यान, नगरविकासमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -