घरक्राइमAkola Crime News : अकोल्यात खळबळ; जिल्हा परिषद शाळेच्या छतावर नवजात अर्भकांचे...

Akola Crime News : अकोल्यात खळबळ; जिल्हा परिषद शाळेच्या छतावर नवजात अर्भकांचे मृतदेह?

Subscribe

अकोला : अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकातील (Ratanlal Plot Chauk) जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या छतावर काही नवजात अर्भकांचे मृतदेह आढळले आहेत. एकाच वेळी चार नवजात अर्भकांचे मृतदेह (Crime News) आढळून आल्यानं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषद उर्दू शाळा आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. शाळेच्या छतावर हे मृतदेह कुठून आले? याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे. या खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे.

वैद्यकीय अहवाल येणे बाकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एक अर्भक आढळून आलं आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळले आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होईल.” दरम्यान, जिल्हा परिषदेच्या आवारात चार अर्भकांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली होती. परंतु, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकच मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

नेमकं प्रकरण काय?

रतनलाल प्लॉट चौक हे ठिकाण गजबजलेलं आणि वर्दळीचं आहे. या शाळेच्या मैदानाजवळ काही मुलं क्रिकेट खेळत होती. खेळता खेळता त्यांचा बॉल शाळेच्या छतावर गेला. काही मुलं बॉल आणण्यासाठी तिथे गेली. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार समोर आला. हे बघून मुलं घाबरुन गेली आणि त्यांनी तिथे जवळच राहणाऱ्या लोकांना सांगितले. लोकांनी या धक्कादायक प्रकाराबाबत पोलिसांना तात्काळ माहिती दिली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. महत्त्वाची बाब म्हणजे, जिल्हा स्त्री रुग्णालय जिल्हा परिषदेच्या शाळेपासून जवळच आहे. सापडलेलं अर्भक स्त्री आहे की, पुरूष अर्भक आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -