घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो - प्रकाश आंबेडकर

मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो – प्रकाश आंबेडकर

Subscribe

अकोला : आरक्षणाचा मद्दा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आणि सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. तर दुसरीकडे ओबीसीमधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देऊ नयेत यासाठी छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजामध्ये दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. छगन भुजबळांनी जालन्यातील ओबीसी मेळाव्याच्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांना अव्हान देण्याची गरज काय होती? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यात दोन समाजात दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. पण आम्ही हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी जिल्ह्यामध्ये बैठका घेऊ. अंबडच्या सभेत भुजबळांनी जरांगेंना राजकीय आव्हान देण्याची गरज काय होती? आरक्षणावरून भांडून काय साध्य होणार आहे? मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत सुटू शकतो. असं देखील आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

या बैठकीला प्रकाश आंबेडकर, प्रा. अंजली आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांची उपस्थिती होती. या सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी आरक्षणासोबतच शेतमालाला भाव आणि ओबीसी जनगणनेचा प्रश्न महत्वाचा असल्याचं म्हटलं आहे.

जालन्यात झालेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, “मराठा समाजाचे नवीन झालेले नेते त्यांना हे आरक्षण कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या बाहेर आहे. कुणाचं खाताय म्हणतो, अरे तुझं खातो काय?, यांना काहीच माहित नाही. अरे आरक्षण काय आहे आधी ते तर समजून घे, आमचा मराठा आरक्षणाला विरोध नाही. छगन भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला असा म्हणतो, हो खातो बेसण भाकर कांदा आजही खातो. पण, तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असा जरांगेंना भुजबळांनी टोला लगावला आहे. आमची सुद्धा लेकरं आहे, तुम्ही वेगळ आरक्षण घ्या, असे भुजबळ म्हणाले.

- Advertisement -

मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसीची सभा पार पाडली. मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देऊ नये या मागणीसाठी सर्वात आधी मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांना ओबीसी नेत्यांचा देखील पाठिंबा मिळाला

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -