घरठाणेदलितांना जीव नाही का? जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्र्यांना सवाल; राज्यभर आंदोलनाचा...

दलितांना जीव नाही का? जितेंद्र आव्हाडांचा मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना सवाल; राज्यभर आंदोलनाचा इशारा

Subscribe

ठाणे – राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. मराठवाड्यात गेल्या चार दिवसांमध्ये दोन दलित तरुणांचा खून (Dalit Live Matters) झाला आहे. या घटनांनी पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासला आहे, मात्र या घटनांची दखल घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांच्याकडे वेळ नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड ((NCP MLA Jitendra Awhad) यांनी केला आहे. दलित अत्याचाराच्या घटनांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आमदार आव्हाड यांनी दिला आहे.

नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून (Akshay Bhalerao murder in Nanded) केल्याची घटना ताजी असतानाच लातूरमधील रेणापूर येथे सावकाराकडून फक्त तीन हजार रुपयांसाठी एका गिरीधारी केशव तुपघाले याची डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण करुन हत्या (Dalit killed in Latur) करण्यात आली आहे.

- Advertisement -

या दोन्ही घटनानंतर आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार आव्हाड यांनी ट्विट करत राज्यात होणाऱ्या दलित अन्याय, अत्याचार आणि हत्यांच्या घटनांवर दलितांचा जीव हा जीव नाही, का? असा सरकारला सवाल केला आहे. राज्यातील दलितांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, याविरोधात लवकरच राज्यभरात आंदोलन छेडले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.

दलित हत्यांवर जितेंद्र आव्हाड यांचा समाजमाध्यमातून संताप
दलित हत्यांवर जितेंद्र आव्हाड यांचा समाजमाध्यमातून संताप

कुठे झाले दोन खून

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात अक्षय भालेराव या तरुणाची गावातील गुंडांनी निर्घृण हत्या केली. त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आली. चार दिवसांपूर्वी ही घटना घडली आहे. गावात आंबेडकर जयंती का साजरी केली, म्हणून त्याला मारहाण करण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे. या प्रकरणी अॅट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करुन दोषींना फाशीची शिक्षा करण्याची मागणी होती आहे. ही घटना ताजी असतानाच मंगळवारी मराठवाड्यातीलच लातूर जिल्ह्यात मातंग समाजाच्या व्यक्तीचा सावकाराने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे. रेणापूर तालुक्यात ही घटना घडली आहे. तीन हजार रुपये १० टक्के व्याजाने घेतलेल्या गिरीधारी केशव तपघाले याने तीन हजार रुपयांपोटी २० हजार रुपये व्याज भरल्यानंतरही पैसे बाकी असल्याचे सांगत सावकाराने भर बाजारात गिरीधारीला मारहाण केली. गिरीधारी सावकाराविरोधात पोलिसात तक्रार देण्यासाठी गेला, मात्र पोलिसांनी त्याच्याकडूनच बाँडपेपरवर वाद मिटल्याचे लिहून घेतले.
त्यानंतर सावकाराने त्याचे घर गाठून तिथे त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून दंडुक्याने बेदम मारहाण केली. यात गिरीधारीचा मृत्यू झाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -