वाशिमचे अलार्म काका! मोती साबण नाही तर डफली वाजवून गावाला जागं करतात

केवळ दिवाळीची पहिली आंघोळ नाही तर दिवाळीचे पाचही दिवस काका डफली घेऊन गावाला उठवायचं काम करतात

Alarm kaka in Vashim district wake up the village by playing duffel in diwali
वाशिमचे अलार्म काका! मोती साबण नाही तर डफली वाजवून गावाला जागं करतात

उठा उठा दिवाळी आली मोती स्नानाची वेळ झाली… ही जाहिरात सर्वांनाच माहिती आहे. दिवाळी म्हणलं की पहिल्या आंघोळीला सर्वांना उठवणारे अलार्म काका आपल्याला हमखास आठवतात. ही झाली जाहिरात मात्र खऱ्या आयुष्यात देखील असे अलार्म काका आहेत बरं का. जे मोती साबण नाही तर चक्क डफली घेऊन दिवाळीच्या पहिल्या अंघोळीला संपूर्ण गाव जाग करतात. हे अलार्म काका आहेत वाशिम जिल्ह्याचे. तब्बल १०० वर्षांपासून ते डफली घेऊन गावाला उठवण्याची त्यांची परंपरा जपत आहेत. सद्या या डफलीवाल्या अलार्म काकांची जोरदार चर्चा सुरू आहे.

डफली वाले अलार्म काका आहेत वाशिम जिल्ह्यातील भट उमरा गावचे. अलार्म काकांचे नाव आहे शिवाजी आवारे. त्त्यांच्या कुटुंबात १०० वर्षांपासून डफली वाजवून गावाला उठवण्याची परंपरा आहे. केवळ दिवाळीची पहिली आंघोळ नाही तर दिवाळीचे पाचही दिवस काका डफली घेऊन गावाला उठवायचं काम करतात. गावाला उठवण्यासाठी आवारे काकांना गावकरी दक्षिणा देखील देतात. आवरे कांकाची डफली ही गावात सर्वांची लाडकी आहे. त्यांच्या इतकी सुंदर डफली कोणीही गावात वाजवू शकत नाहीत असे गावकरी सांगतात.

मोती साबणाच्या जाहिरातीतून सर्वांना दिवाळीच्या अंभ्यगस्नासाठी उठवणारे अलार्म काका कळले. मात्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आवारे काकांसारखे अनेक अलार्म काका आपल्याला पहायला मिळतात. प्रत्येक जिल्ह्यात दिवाळीचा पहिला दिवस साजरा करण्याची वेगवेगळी पद्धत आहे.

यंदाची दिवाळी ही सर्वांसाठी खास आहे. यंदा राज्यातील कोरोना कहर कमी झाला असून अनेक निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक लहान लहान गावात शहारा लोक मोठ्या उत्साहाने दिवाळ सण साजरा करत आहेत.


हेही वाचा – Ayodhya Deepotasav 2021: अयोद्धेत १२ लाख दिव्यांचा नवा रेकॉर्ड, ९ लाख दिव्यांनी उजळला शरयू नदीचा काठ