Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र अरेच्चा! अभिजित बिचुकले आणि आनंद दवेंना नोटापेक्षाही कमी मते

अरेच्चा! अभिजित बिचुकले आणि आनंद दवेंना नोटापेक्षाही कमी मते

Subscribe

Abhijeet Bichukle news Pune | अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या निकालांचे कलही समोर आले आहेत. या दोघांनाही नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने पुण्यात हशा पिकला आहे.

Abhijeet Bichukle news Pune | पुणे – कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षानंतर ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली असल्याने सगळ्यांचं या निकालाकडे लक्ष लागून राहिलं आहे. कसब्यातील मतमजोणीच्या २२ फेऱ्या होणार असून चिंचवडमध्ये ३६ फेऱ्या होणार आहेत. या फेऱ्यांचे प्राथमिक निकाल समोर आले आहेत. त्यानुसार अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले आणि ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांच्या निकालांचे कलही समोर आले आहेत. या दोघांनाही नोटापेक्षाही कमी मते मिळाल्याने पुण्यात हशा पिकला आहे.

हेही वाचा – अभिजीत बिचुकले आता कसबापेठ निवडणूक लढवणार; म्हणाले, भकास…

- Advertisement -

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर तिथे पोटनिवडणुका जाहीर करण्यात आल्या. ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता भाजपाकडून प्रयत्न करण्यात आले. परंतु, महाविकास आघाडीने येथून उमेदवार उभा केलाच. राज्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच बिगबॉस फेम अभिजित बिचुकलनेही या निवडणुकीत एन्ट्री घेत उमेदवारी अर्ज भरला. . भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे, असं म्हणत अभिजीत बिचुकले यांनी कसबा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक अधिक रंजक ठरली.

कसब्यातून भाजापकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, या मतदारसंघात ब्राह्मण समाजाला डावललं जात असल्याचा मुद्दा पुढे करून ब्राह्मण महासंघाकडून आनंद दवे यांनीही उमेदवारी अर्ज भरला. मला या मतदारसंघातून ब्राह्मण महासंघाचा मोठा पाठिंबा मिळेल अशी माहिती देण्यात आली.
मात्र, प्रत्यक्षात अभिजित बिचुकले आणि आनंद दवे या दोघांनाही नोटापेक्षाही कमी मते मिळाली आहेत. अभिजित बिचुकले यांना पहिल्या फेरीत अवघी ४ मते मिळाली असून आनंद दवे यांना १२ मते मिळाली आहेत. तर, पहिल्या फेरीत नोटाला ८६ मते मिळाली आहेत.

- Advertisement -

- Advertisment -