Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र कास पठाराच्या श्री घाटाई मंदिर परिसरात दारुच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकचा खच

कास पठाराच्या श्री घाटाई मंदिर परिसरात दारुच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकचा खच

स्थानिकांकडून देवीचे पावित्र्य धोक्यात घालवण्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Related Story

- Advertisement -

निर्सगाच्या कुशीत वसलेले कासचे पठार. हजारो प्रकारची विविध रंगांची फुले या कास पठाराच्या अथांग पसरलेली असतात. अनेक ठिकाणाहून पर्यटक या कास पठाराला भेट देत असतात. याच कास पठाराच्या कुशीत वसलेल्या घनदाट वनराईत एक स्वयंभू असे श्री घाटाई देवीचे मंदिर आहे. अनेक वर्षांपासून भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. देवीच्या या यात्रेसाठीही लाखो भाविक देवीच्या मंदिराल भेट देत असतात. मात्र या मंदिर परिसरात काही धक्कादायक प्रकार होताना दिसत आहेत. तीर्थक्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी या ठिकाणी अनेक प्रयत्न केले जातात. मात्र या परिसरात दारुच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे कास पठारा जवळ राहणारे स्थानिक नागरिकही हैराण झाले आहेत. स्थानिकांकडून देवीचे पावित्र्य धोक्यात घालवण्याऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कास पठारावर असलेल्या या श्रीघाटाई देवीच्या मंदिर परिसरात अनेक दारुच्या बाटल्या, प्लॅस्टिकचा कचरा पडलेला दिसून येत आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी चुली पेटवून रात्रीच्या वेळीस या ठिकाणी ओल्या पार्ट्या करण्यात येत असल्याचे तिथल्या स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतप्त वातावरण पहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देवीवर अनेकांची श्रद्धा आहे. भक्तांच्या देणगीतून काही दिवसांपूर्वी देवीच्या मंदिराचा जिर्णोध्दार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसरात अनेक ठिकाणी सुशोभिकरण करण्याचे कामही सुरु आहे. देवीच्या मंदिराचा विकास होत असताना अशाप्रकारची थिल्लरपणाचे चित्र दिसत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

- Advertisement -

देवीच्या या प्रसिद्ध मंदिराची अनेक कामे खासदार उदयनराजे भोसले यांच्या मार्फत अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. त्यामुळे या साध्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. देवीच्या मंदिराबाहेरचा परिसर हा निसर्ग सौदर्यांने नटलेला आहे. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात नवराई असल्याने मोठ मोठी झाडे या भागात आहे. अनेक पक्षांचा वावर हा या परिसरात सातत्याने होत असतो. अशा परिसरात असे बेशिस्त आणि विघातक कामे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी श्रीघाटाई देवी मंदिर ट्रस्टकडून करण्यात येत आहे.


हेही वाचा – आंतरराष्ट्रीय डॉनशी संबंध असलेल्या गणेश नाईकांची SIT मार्फत चौकशी करा – सुप्रिया सुळे

- Advertisement -