घरताज्या घडामोडीमध्य रेल्वेच्या 'ट्रू लाइफ सेव्हर्स' मोटरमननी वाचवले 12 जणांचे जीव

मध्य रेल्वेच्या ‘ट्रू लाइफ सेव्हर्स’ मोटरमननी वाचवले 12 जणांचे जीव

Subscribe

मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमननी एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वेळेवर आणि तत्पर कारवाई करत तब्बल 12 जणांचे जीव वाचवल्याची माहिती समोर येत आहे.

लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा गर्दीचा आणि धक्काबुक्कीचा सामना करावा लागतो. धक्काबुक्कीमुळे बऱ्याच प्रवाशांचा अपघाती मृत्यूही झाला आहे. मात्र, बऱ्याचवेळा लोकलचे मोटरमन प्रसंगावधान राखून प्रवाशांचे प्राण वाचवतात. अशाच मध्य रेल्वेच्या सतर्क मोटरमननी एप्रिल ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वेळेवर आणि तत्पर कारवाई करत तब्बल 12 जणांचे जीव वाचवल्याची माहिती समोर येत आहे. (Alert Motormen of Central Railway True Life Saviors save 12 lives on the railway track)

लोकल मोटरमनने एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत जीव वाचवलेल्या 12 जणांपैकी 4 जीव ऑगस्टमध्ये, 2 जुलैमध्ये, 3 जून मध्ये, 2 जणांना मे आणि 1 प्रवाशाचा जीव एप्रिलमध्ये वाचवला आहे. या

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मोटरमन संजय कुमार चौहान यांनी ठाणे-अंबरनाथ मार्गावरील लोकलमध्ये काम करत असताना, किमी 33/122 येथे एक व्यक्ती ट्रेनच्या समोर रुळावर पडलेली पाहिली. त्यावेळी त्यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक मारत गाडी थांबवली. त्यानंतर संबंधित व्यक्ती त्या रेल्वे रुळावरून उठला आणि तेथून निघून गेला. 31 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मोटरमन जी. एस. बिस्ट यांनी टिटवाळा- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मार्गावरील लोकलमध्ये काम करत असताना, अंदाजे 55 ते 56 वर्षे वयोगटातील एक महिला प्रवाशी दिवा-ठाणे धीम्या मार्गावर किमी 34/211 वर ट्रॅकच्या मध्यभागी येऊन ट्रेनसमोर उभी राहिली होती. त्यावेळी जी. एस. बिस्ट यांनी तात्काळ आपत्कालीन ब्रेक मारत महिलेच्या काही मीटर आधी ट्रेन थांबवली आणि तिचा जीव वाचवला. 28 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.

- Advertisement -

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मोटरमन एस. व्ही. जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – ठाणे येथे कर्तव्यावर असताना एक तरुणी चिंचपोकळी-भायखळा अप लोकल मार्गादरम्यान रुळावर येताना दिसली. त्यानंतर काही फूट आधी ट्रेन थांबवून त्या तरुणीचा जीव वाचवला. त्यांनी ट्रेन मॅनेजरला याची माहिती दिली. त्यानंतर, आरपीएफ कर्मचार्‍यांनी त्या तरुणीला ट्रॅकवरून बाहेर काढले आणि मोटरमनने गंतव्यस्थानापर्यंत सुरक्षितपणे काम केले. 27 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे मोटरमन राम शब्द यांनी अंबरनाथ- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ट्रेनमध्ये काम करत असताना चिंचपोकळी स्थानकात प्रवेश करताना एक तरुण प्रवासी दिसला ज्याचे वय अंदाजे 19-20 वर्ष असावे त्याने, ट्रॅकच्या मध्यभागी उडी मारली आणि ट्रेनसमोर उभा राहिला. त्यावेळी राम शब्द यांनी तात्काळ आपतकालीन ब्रेक मारत ट्रेन थांबवली त्यामुळे त्याचा जीव वाचला. 19 ऑगस्ट रोजी ही घटना घडली होती.


हेही वाचा – मुंबईमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात ५.४९ किलो निर्माल्य जमा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -