भाजपचे सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश, रात्रीचा मुक्काम प्रेसिडेंशियल हॉटेलवर

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात उद्या (30 जून) ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस आणि भाजप कामाला लागली आहे. भाजपने सर्व आमदारांना मुंबई गाठण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या सर्व आमदारांचा रात्रीचा मुक्काम प्रेसिडेंशियल हॉटेलवर असणार आहे.

एकनाथ शिंदे आणि आमदार मुंबईत दाखल होणार – 

महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आल्याचा दावा बंडखोर शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. बंडखोरी करून शिंदे यांनी आपल्या सोबत 51 आमदार असल्याचा दावा केला आहे. हे सर्व आमदार सध्या आसामच्या गुहाटीमधील एक हॉटेलवर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आम्ही उद्या मुंबईत दाखल होणार असून सत्तास्थापनेची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे म्हंटले आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदारांना मुंबईत दाखल होण्याचे आदेश –

राज्यात उद्या (30 जून) ठाकरे सरकारची बहुमत चाचणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या आमदारांन मुंबईत दाखल होण्याचे आदेश दिले आहेत.

विधानसभेतील पक्षीय बलाबल – 

काँग्रेस – 44

राष्ट्रवादी काँग्रेस – 55

शिवसेना (शिंदे गट सोडून) -15

भाजप – 106

शिंदे गट – 50