राज्यातील सर्व सहकारी संस्थाच्या निवडणुकांनाही ब्रेक, ३० सप्टेंबरपर्यंत स्थगिती

या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून नवे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. 

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (All co-operative society elections in the state are also suspended till September 30)

हेही वाचा – मोठी बातमी! राज्यातील ९२ नगरपालिका आणि ४ नगर पंचायतीच्या निवडणुका स्थगित

राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून, नदी–नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला ९२ नगरपालिका, ४ नगर पंचायती आणि  १५ ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भाजपने केली होती. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांची भेट घेऊन पक्षाच्या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर सद्यस्थिती पाहता निवडणूक आयोगानं या सर्व निवडणुका रद्दच करण्याचा निर्णय घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून नवे वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.