मोठी बातमी! शहरप्रमुखांसह बदलापूरमधील सेनेचे सर्व नगरसेवक शिंदे गटात सामील

तसंच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पवार हेदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडल्यानंतर कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील शिवसेनेच्या सर्व विद्यमान नगरसेवकांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. तसंच ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील आणि उपाध्यक्ष सुभाष पवार हेदेखील शिंदे गटात सामील झाले आहेत. (All Corporator of shivsena from badlapur entered in the shinde group)

हेही वाचा  – देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातले मुख्यमंत्री, विनायक मेटेंचं मोठं वक्तव्य

मागील निवडणुकीत बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेचे 24 नगरसेवक निवडून आले होते. यासोबतच शिवसेनेचे तीन स्वीकृत नगरसेवक आहेत. या सर्व नगरसेवकांनी शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. मागील काही दिवसांपासून बदलापूरमधील वामन म्हात्रे गट हा नेमकं उद्धव ठाकरे यांच्यासोबत की एकनाथ शिंदे यांच्यासोबत याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली होती. तसंच शहरात एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा देण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनर वर सुद्धा उद्धव ठाकरे यांचे फोटो लावण्यात आले होते.

हेही वाचा – दोन वाढपे व्यवस्थित वाढत असतील तर ४० जणांची गरज काय? पडळकरांचा सवाल

अशा परिस्थितीत शनिवारी सकाळी म्हात्रे गटाने शहरातील सर्व नगरसेवकांसह शिंदे गटाला समर्थन दिले आहे. वामन म्हात्रे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदे गटात गेल्याने बदलापूर मध्ये शिवसेनेला मोठी खिंडार पडली आहे.