घरताज्या घडामोडीMaharashtra Corona: राज्यातील सर्व वसतीगृहे बंद राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Corona: राज्यातील सर्व वसतीगृहे बंद राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Subscribe

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण क्षेत्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा गुरुवार ०६ जानेवारी पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे.

राज्यातील सर्व विद्यापिठाशी संबंधित वसतिगृहे ही विद्यार्थ्यांना काही कालावधी देऊन तसेच पूर्वसूचना देऊन वसतिगृहे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णयही घेण्यात आल्याचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. त्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देऊनच हा निर्णय राबवावा असे उदय सामंत यांनी सांगितले.

परदेशातून जे विद्यार्थी पीचएडी तसेच संशोशधनासाठी आले आहेत, त्यांची सर्व काळजी घेऊन विद्यापिठे बंद करू नयेत. त्यांची सर्व काळजी विद्यापिठांनी घ्यावी असेही त्यांनी उदय सामंत यांनी स्पष्ट केले. हे विद्यार्थी तातडीने परदेशात जाऊ शकत नाही, त्यामुळे परदेशी विद्यापिठांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले नसल्यास त्यासाठी विशेष कॅम्प लावून हे लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. राज्यातील महापालिकांनीही विद्यार्थ्यांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आकडा माहिती करून घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. १५ ते १८ वयोगटातील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे कॅम्प लावून लसीकरण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

ठाणे ग्रामीण क्षेत्रातील शासकीय वसतिगृहे, आश्रमशाळा आजपासून बंद

ठाणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण क्षेत्रातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत कार्यरत असणारी शासकीय वसतिगृहे, शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळा गुरुवार ०६ जानेवारी पासून पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला आहे. यासंदर्भात आज आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

- Advertisement -

विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ऑनलाईन शिक्षण पूर्ववत चालू राहील. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग फक्त अध्ययन अध्यापनासाठी विद्यार्थी व पालकांच्या संमतीनुसार सुरू ठेवता येतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.


हेही वाचा – शाळांपाठोपाठ महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार- उदय सामंत


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -