पदवीधर मतदारसंघातील भाजपा उमेदवारांबाबत देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकासाठी उमेदवारांच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणुकासाठी उमेदवारांच्या प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे. अशातच आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (All our candidates will win in Graduate Constituency Says DCM Devendra Fadnavis)

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यातील एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. त्यावेळी संबंधित पुस्तकाचे प्रकाशन फडणवीसांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित प्रसारमाध्यमधील एका पत्रकाराने पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे सर्व उमेदवार विजय होणार का? असा सवाल विचारला. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘सर्व विजयी होतील’ असे सांगितले.

विशेष म्हणजे या निवडणुकीसाठीची खरी लढत ही महाविकास आघाडी आणि भाजपामध्ये सुरू आहे. त्यामुळे आता या निवडणुकीत नेमक्या कोणत्या पक्षाला जास्त मत मिळतात आणि पदवीधर मतदारसंघात कोणत्या पक्षाचा विजय होणार हे, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाकरिता जाहीर प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. तसेच, येत्या सोमवारी (30 जानेवारी 2023) विभागातील पाचही जिल्ह्यांत मतदान पार पडणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात सर्वच उमेदवारांनी जोर लावल्याचे पाहायला मिळाले.

नाशिक पदवीधरची निवडणूक राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. यंदाच्या निवडणुकीत 16 उमेदवार नशीब आजमावत असले तरी राष्ट्रीय पक्षांचा एकही अधिकृत उमेदवार रिंगणात नाही. त्यामुळे ही निवडणूक सर्वार्थाने वेगळी ठरली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मागील 15 दिवसांपासून पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे विभागातील पाचही जिल्हे पिंजून काढले आहेत.

येत्या सोमवारी पाचही जिल्ह्यांतील 338 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते संध्याकाळी 4 या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे.


हेही वाचा – प्राध्यापक मारहाण प्रकरण : महिलांना कुणी अपशब्द वापरल्यास असे गुन्हे अंगावर घ्यायला तयार – संतोष बांगर