घरठाणेठाण्यात ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन

ठाण्यात ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन

Subscribe

पोलिसांकडून 184 जणांच्या हाती बेड्या

ठाणे शहर, भिवंडी, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर,बदलापूर, अंबरनाथ या ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात अचानक 5 तासांचे राबविलेले ‘ऑल आऊट कोम्बींग ऑपरेशन’ 184 जणांना चांगलेच महागात पडले आहे. यामध्ये अवैध शस्त्र बाळगणे असो दारू बंदी किंवा अंमली पदार्थ तसेच पाहिजे असलेला असो असे एकूण 177 गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. या ऑपरेशनसाठी 285 पोलीस अधिकार्‍यांसह 2 हजार 399 पोलीस कर्मचार्‍यांचा फौज तैनात केला होता.

याचदरम्यान ठाणे शहर वाहतूक शाखेनेही 1 हजार 653 केसेस नोंदवून तब्बल 10 लाखांहून अधिकची दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये विना हेल्मेटच्या 595 तर विना सीट बेल्टच्या 234 आणि 91 मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांवर कारवाई केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाणे शहर पोलीस आयुक्त जयजित सिंग यांच्या आदेशानुसार बुधवारी 23 नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता सुरू झालेले कोम्बिंग ऑपरेशन 24 नोव्हेंबरला मध्यरात्री एक वाजेपर्यंत राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये गुन्हेगारी कृत्याला आळा घालणे हाच उद्देश होता.

- Advertisement -

या ऑपरेशन दरम्यान अवैध शस्त्र, अग्नीशस्त्रे जप्ती, फरारी पाहीजे आरोपी अटक करणे, हॉटेल, डान्सबार तपासणे, हुक्कापार्लर, परोल आदेशाचे उल्लंघन केलेल्या आरोपीचा शोध घेणे, वाहने तपासणे, अभिलेखावरील हिस्ट्रीशीटर व गुंड तपासणे, अजामिनपात्र वॉरंटची बजावणी करणे, ऑटोरिक्षा व मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांवर कारवाई, झोपडपट्ट्या व संवेदनशिल ठिकाणे यांची तपासणी करून संशयीत इसमावर प्रतिबंधक कारवाई करणे, पोलीस स्टेशनचे अभिलेखावरील सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. हे ऑपरेशनमध्ये एकूण 177 गुन्हे दाखल करत 184 जणांना अटक करण्यात यश आले. यामध्ये अवैध शस्त्र बाळगणार्‍या 13 जणांना अटक केली. दारू बंदी गुन्ह्यांखाली 46, अंमली पदार्थ गुन्ह्याखाली 35 जणांचा समावेश आहे.

अशी आहे वाहतूक पोलिसांनी कारवाई
या ऑपरेशन दरम्यान ठाणे शहर वाहतूक पोलिसांनी
एक हजार 653 केसेस नोंदवून 10 लाख 7 हजार 200 रुपयांची दंडात्मक वसुली केली आहे. यामध्ये 595 विना हेल्मेट दुचाकी चालविणार्‍यांकडून 3 लाख 17 हजार 250 दंड वसूल केला आहे. त्यापाठोपाठ 301 इतर कारवाईत 1 लाख 80 हजार 550 तर 222 रिक्षाचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून 1 लाख 77 हजार 200 तसेच विना परवाना वाहन चालविणार्‍या 42 चालकांकडून 1 लाख 60 हजार 500 रुपयांच्या दंडवसुलीचा समावेश आहे. विशेष मद्यप्राशन करून वाहन चालविणार्‍यांना 91 चालकांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे म्हटले आहे. गणवेश परिधान न करणे,सिग्नल तोडणे,मोबाईलवर बोलत वाहन चालविणे यासारखे केसेस दाखल केल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -