घरमहाराष्ट्रनागपूरभाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू- शरद पवार

भाजप व्यतिरिक्त सर्व पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू- शरद पवार

Subscribe

शरद पवारांच्या या विधानानंतर येत्या निवडणूकांमधलं चित्र हळुहळू स्पष्ट होणार आहे.

२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना भाजपला पराभूत करण्यासाठी विविध योजनांवर काम करण्यास सुरूवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सभा चालू आहेत. देशात 2024 ला होणाऱ्या निवडणुकांसाठी आता सगळेच पक्ष मैदानात उतरले आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपविरोधी सर्व पक्ष एकत्र येण्यावर चर्चा सुरू असल्याचं शरद पवार यांनी सांगितलंय. त्यामुळे शरद पवारांच्या या विधानानंतर येत्या निवडणूकांमधलं चित्र हळुहळू स्पष्ट होणार आहे.

सध्या शदर पवार हे नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मोठं विधान केलंय. भाजप व्यतिरिक्त सगळेच पक्ष एकत्र येणार आहे, अशा चर्चा सुरू असल्याचे संकेत यावेळी शरद पवार यांनी दिले. त्यामुळे भाजपला हरवणे हेच सर्व पक्षांचे लक्ष्य असणार आहे. राज्यातील सत्ताधारी भाजप व शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या महाविकास आघाडीच्या एकजुटीला आणखी बळकटी देण्यासाठी वेगवेगळे प्लॅन्स देखील आखण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: मविआ सभेपूर्वी पवार – गडकरींची भेटी; ‘हे’ आहे कारण

- Advertisement -

हे ही वाचा: राहुल गांधींसाठी काय पण! ‘या’ महिलेने इमारतच त्यांच्या नावावर केली

एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ांपासून राज्यात विभागवार घेण्यात येणाऱ्या महाविकास आघाडीच्या संयुक्त जाहीर सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्तुत्तर देण्याची रणनीती आखण्यात येत आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या कारभाराविरोधात विशेषत: महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रान उठविण्याची रणनीती महाविकास आघाडी सरकारने आखली आहे. त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर येथील २ एप्रिल रोजी आयोजित केलेल्या संयुक्त जाहीर सभेतून केली जाणार आहे. सध्याच्या परिस्थितीत शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर समविचारी पक्षांनी भाजपला पराभूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्याचं दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -