पुणे : मराठा आरक्षणाच्या संदर्भात शुक्रवारी (8 सप्टेंबर) रात्री 10.30 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. रात्री 2.30 वाजेपर्यंत चाललेल्या बैठकीत तोडगा काढण्यात आला. मात्र मनोज जरांगे पाटील यांनी राज्यसरकारचे निर्णय फेटाळत उपोषण सुरूच ठेवले आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मोडीत काढण्यासाठी उद्या (11 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. ते आज पुण्यात माध्यमांशी बोलत होते. (All party meeting in Mumbai tomorrow on Manoj Jarangs demands Information given by Ajit Pawar will there be a way out regarding reservation)
हेही वाचा – बॅनर लावून भावी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री होता येत नाही त्यासाठी…; अजित पवार स्पष्टच बोलले
अजित पवार म्हणाले की, जालन्यातील अंबड तालुक्यामध्ये त्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांच्या स्तरावर अनेक बैठका झाल्या, रात्री उशीरापर्यंत चर्चा झाल्या, त्याचं शिष्टमंडळ मुंबईत आलं. मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन अर्जुन खोतकर, गिरीश महाजन आणि बाकीचे सहकारी गेले. पण अद्यापपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी समजवून सांगण्याचं कोणी करू शकलं नाही. त्यामुळे उद्या राज्यातील सर्व विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक मुख्यमंत्र्यांनी सह्याद्रीवर बोलावली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा – नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना घेराव; राजकीय नेते आता आंदोलकांच्या रडारवर
मराठा आरक्षणावर बोलताना अजित पवार म्हणाले की, मनोज जरांगेंकडून एक मागणी आली आहे, कुणबी समाजानेही एक मागणी केलेली आहे. कुणबी समाजने म्हटले आहे, आमच्यामध्ये कोणाला बळजबरीनं घालू नका. याशिवाय ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या मान्यवराचं मत आपण सर्वांनी एकलेलं आहे. त्यामुळे कोणालाही न दुखवता मार्ग निघायला पाहिजे, याबद्दल कोणाचं दुमत नाही. सर्व राजकीय म्हणतात कोणालाही न दुखावता, कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता मार्ग निघाला पाहिजे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता सर्वपक्षीय बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर तोडगा निघणार का? हे पाहावे लागेल.