घरताज्या घडामोडीसमृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींची सभा आणि त्यानंतर 'या' भागाचं मोठं नुकसान;...

समृद्धी महामार्गाचे लोकार्पण, पंतप्रधान मोदींची सभा आणि त्यानंतर ‘या’ भागाचं मोठं नुकसान; वाचा नेमकं काय घडलं?

Subscribe

हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर प्राण्यांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहे. या ग्रीन कॉरिडॉरमध्ये अनेक रोप लावण्यात आली आहेत. मात्र ही रोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर बाहेर पडलेल्या लोकांनी तुडवल्याचे पाहायला मिळाले.

हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर प्राण्यांसाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आले आहे. या ग्रीन कॉरिडॉरमध्ये अनेक रोप लावण्यात आली आहेत. मात्र ही रोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर बाहेर पडलेल्या लोकांनी तुडवल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आज समृद्धी महामार्गाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समृद्धी महामार्गावर किमान ३५ लाख झाडं लावली जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीन कॉरिडॉर असेल, असा दावा केला होता. मात्र त्यांच्या हा दावा लोकांनी पायदळी तुडवल्याचे दिसते.

मुंबई आणि नागपूरकरांसाठी महत्वाचा असलेल्या हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचा लोकार्पण सोहळा रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदींची सभा झाली. मोदींच्या सभेनंतर संपल्यानंतर लोकं बाहेर पडली त्यावेळी त्यांनी एम्सच्या परिसरात लावलेली रोपे पायाने तुडवली. सभेतून बाहेर पडलेले सगळे जण या रोपांवरून चालत गेले. त्यामुळे ही नव्याने लावलेली ही रोपे पार झोपून गेली. सभेतील लोकांनी एम्स रुग्णालयाबाहेरील ग्रीन कॉरिडोअरची अक्षरश: वाट लावली. एम्सपासून समृद्धी महामार्ग हा काही अंतरावरच आहे.

- Advertisement -

दरम्यान, समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केल्यानंतर एम्स येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये सांगितली. यावेळी त्यांनी “हिंदुहृदयस्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग उभारताना आम्ही सर्व काळजी घेतली आहे. हा रस्ता इको-फ्रेंडली आहे. या मार्गावर किमान ३५ लाख झाडं लावली जाणार आहेत. त्यामुळे समृद्धी महामार्ग हा पूर्णपणे ग्रीन कॉरिडॉर असेल”, असेही म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. यावेळी पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे ढोल- ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी खुद्द मोदींनीही ढोल वाजवण्याचा मोह आवरता आला नाही. मोदींनी यावेळी ढोल वाजवण्याचा आनंद घेतला.

- Advertisement -

समृद्धी महामार्ग किंवा नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे प्रकल्प हे पंतप्रधानांचे देशभरातील उत्तम कनेक्टिव्हिटी आणि पायाभूत सुविधांच्या व्हिजनला साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55,000 कोटी रुपये खर्चून 701 किलोमीटरचा हा एक्स्प्रेस वे बांधला जात आहे.

समृद्धी महामार्ग हा भारतातील सर्वात लांब एक्सप्रेस मार्गांपैकी एक आहे, जो महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमधून आणि अमरावती, औरंगाबाद आणि नाशिक या प्रमुख शहरी भागांमधून जातो. समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरेल. हा एक्स्प्रेस वे आसपासच्या इतर 14 जिल्ह्यांचा संपर्क सुधारण्यास मदत करेल, असे पीएमओने एका निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास मदत होईल.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्सप्रेस अन् एम्स नागपूरचं लोकार्पण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -