घरमहाराष्ट्रराज ठाकरेंची सगळी आंदोलने फेल

राज ठाकरेंची सगळी आंदोलने फेल

Subscribe

काही राजकारण्यांना फुकटच्या प्रसिद्धीचा हव्यास असतो. कारण लाखो, करोडो रुपये खर्च करूनही तो मिळत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत भरपूर प्रसिद्धी दिली, परंतु राज ठाकरे यांचे एकही आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही.

काही राजकारण्यांना फुकटच्या प्रसिद्धीचा हव्यास असतो. कारण लाखो, करोडो रुपये खर्च करूनही तो मिळत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रसारमाध्यमांनी आतापर्यंत भरपूर प्रसिद्धी दिली, परंतु राज ठाकरे यांचे एकही आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही. त्यांची सगळी आंदोलने फेल गेली आहेत. उलट त्यांच्या आंदोलनामुळे राज्य आणि समाजाला नुकसानच झाले असल्याची जळजळीत टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. शुक्रवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, राज ठाकरे इकडून निघाले, इकडे पोहोचले अशा प्रकारचे कव्हरेज मीडियाने भरपूर दिले, परंतु त्यांचे एकही आंदोलन यशस्वी होऊ शकले नाही. मागे त्यांनी टोलविरोधात आंदोलन केले. फक्त एक दिवस सगळे टोलजवळ जमले. त्याचे पुढे काय झाले? परप्रांतीयांविरोधात आंदोलन केले, टॅक्सीवाल्यांना मारले. परप्रांतीयांना महाराष्ट्रातून निघून जा म्हणाले, पण काय झाले? बिल्डरांना इमारतीची कामे करण्यासाठी माणसे मिळेनाशी झाली. पुन्हा त्यांना पकडून आणावे लागले. टोलमुळे रस्त्यांची कामे झाली, रस्ते सुधारले, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. परप्रांतीय मजूर निघून गेल्यास कामे कशी होणार? कारण आपल्याकडे तशी कामे करणारी माणसेच नाहीत याचाही विचार करायला हवा होता. आताही भोंग्यांवरून सुरू झालेल्या राजकारणाचा फटका मंदिरांनाही बसत आहे. रात्रीच्या वेळेस जागरण-गोंधळ, कीर्तनासाठी जमणार्‍यांना होत आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

राज यांच्यावर दुसर्‍यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी
राज ठाकरे यांच्या विरोधात बीडमधील परळी न्यायालयाने दुसर्‍यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. याआधी १० फेब्रुवारी रोजी न्यायालयाने राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. त्यांना १३ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते, परंतु ते गैरहजर राहिल्याने परळी न्यायालयाने दुसर्‍यांदा राज यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. ऑक्टोबर २००८मध्ये मुंबईत राज ठाकरे यांच्या अटकेनंतर राज्यभरात अनेक ठिकाणी तोडफोड तसेच दगडफेक झाली होती. परळीतही अशा घटना घडल्याने परळी पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते, तर याच प्रकरणात सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनीदेखील राज यांच्या विरोधात ६ एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -