भाजपने कितीही दावे केले तरी मविआचे चारही उमेदवार निवडून येतील, जयंत पाटलांचा विश्वास

आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत, असं जयंत पाटील म्हणाले.

win the trust of the people of Maharashtra again said Jayant Patil

मुंबई – आमची बेरीज बघितली तर महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. भाजपने कितीही दावे केले तरी आम्हीच जिंकू असं ते म्हणाले. (All the four candidates of MVA will be elected says Jayant Patil)

आज राज्यसभेसाठी मतदान होत असून विधानभवनात जात असताना जयंत पाटील यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.

हेही वाचाRajya Sabha Election : ४ राज्यात १६ जागांवर राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान, कोण मारणार बाजी?

आम्ही तिन्हीही पक्ष एकत्र लढत आहोत. नाराजी कुणाची नाही. सर्व संपर्कात आहेत. मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी अपिल केले आहे. अपिलाचा निर्णय त्यांच्या बाजूने व्हावा अशी अपेक्षा आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

देशातील ४ राज्यांमध्ये राज्यसभेच्या एकूण १६ जागांवर निवडणूक होत आहे. शुक्रवारी राज्यसभेच्या जागांसाठी मतदान सुरु होत आहे. यानंतर लगेच संध्याकाळपर्यंत निवडणुकीचे निकाल समोर येतील. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या चार राज्यांमध्ये राज्यसभेच्या निवडणुका होणार आहेत. एका एका मतासाठी राजकीय पक्षांनी आपल्या आमदारांना नजरकैद ठेवलं आहे.

हेही वाचा – मलिकांना मतदानासाठी तूर्त परवानगी नाहीच; फेरविचारासाठी पुन्हा याचिका करणार

दरम्यान, नवाब मलिक यांना मतदानाची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाकडून फेटाळण्यात आली आहे. नवाब मलिक लवकरच नवी याचिका दाखल करणार असून, त्यात मतदानासाठी परवानगी मिळावी ही मागणी करणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावं, यासाठी नवाब मलिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मतदानासाठी आपल्याला एक दिवसाचा जामीन मिळावा, अशी मागणी नवाब मलिकांनी याचिकेत केली होती. पण मुंबई उच्च न्यायालयानं ती फेटाळून लावली आहे.