घरCORONA UPDATEमुख्यमंत्र्यांसह सर्व नवनिर्वाचीत आमदार सोमवारी शपथ घेणार

मुख्यमंत्र्यांसह सर्व नवनिर्वाचीत आमदार सोमवारी शपथ घेणार

Subscribe

सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून, त शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ तर भाजपचे ४ असे एकूण ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांची निवडणूक ही बिनविरोध झाली असून, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ८ जण बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने संख्याबळानुसार उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली असून, त शिवसेनेचे २, राष्ट्रवादीचे २ आणि काँग्रेसचा १ तर भाजपचे ४ असे एकूण ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

सोमवारी घेणार शपथ

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व नवनिर्वाचित आमदार हे सोमवारी १८ मे रोजी  दुपारी १ वाजता विधानपरिषद सभापतींच्या उपस्थितीत विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री झाल्यानंतर ६ महिन्याच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्या तरी एका सभागृहाचे सदस्य व्हावे लागणार होते. अखेर आता उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे ते आता १८ तारखेला विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेणार आहे.

- Advertisement -

कोण घेणार शपथ

उद्धव ठाकरे – शिवसेना

निलम गोऱ्हे – शिवसेना

- Advertisement -

राजेश राठोड – काँग्रेस

शशिकांत शिंदे – राष्ट्रवादी

अमोल मिटकरी – राष्ट्रवादी

रणजितसिंह मोहिते पाटील – भाजप

गोपीचंद पडळकर – भाजप

प्रवीण दटके – भाजप

रमेश कराड– भाजप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -