घरताज्या घडामोडीवन्यजीव तस्करी प्रकरणी सर्वच संशयितांचा जामीन फेटाळला

वन्यजीव तस्करी प्रकरणी सर्वच संशयितांचा जामीन फेटाळला

Subscribe

न्यायालयीन कोठडी कायम

नाशिकरोड : नाशिक, धुळे, नगर जिल्ह्यातील वन्यजीवांची अवैध तस्करी प्रकरणातील १९ जणांना न्यायालयाने जामीन फेटाळल्याची माहिती सुत्रांनी दिली.

याबाबत समजलेली माहिती अशी, १ जून रोजी येवल्यातील सत्यगावात सापडलेल्या मांडूळ सापडून आल्यानंतर वनविभागाच्या वतीने वन्यजीवांची तस्करी करणा-या १९ जणांना ताब्यात घेत रॅकेटचा फर्दाफाश केला होता, संशयितांच्या वकिलाने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला होता. शनिवारी (दि. २०) संशयितांपैकी दहा जणांना उभे केले असता जामीन अर्ज फेटाळला. शुक्रवारी (दि. १९) नऊ जणांचा फेटाळला होता. यामुळे या प्रकरणातील सर्वच संशयितांचा जामीन अर्ज फेटाळून न्यायालयीन कोठडी कायम ठेवल्याचे वनविभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. सरकारच्या वतीने ए. एस. वैष्णव यांनी बाजू मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -